भारतीय खाद्यपदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. चपाती हा भारतीय जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि नानपासून रोटीपर्यंत लोकांना तो खूप आवडतो. पण तुम्हाला माहीत आहे का की सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही भारताच्या नावावर आहे. सर्वात मोठ्या चपातीचे वजन सुमारे १४५ किलो होते. ही चपाती खास प्रसंगी बनवली जाते आणि ही शेकडो लोकांचे पोट भरते.
जगातील सर्वात मोठी चपाती गुजरातमधील जामनगरमध्ये बनवली जाते. जामनगरमधील जलाराम बापा आणि दगडू सेठ गणपती सार्वजनिक उत्सवाच्या जयंतीला ही मोठी चपाती बनवली जाते. ही चपाती जलाराम मंदिराच्या जीर्णोद्धार समितीकडून बनवली जाते अन् मंदिरात येणाऱ्या सर्व लोकांना दिली जाते. जामनगरच्या बाहेरूनही अनेक जण ही चपाती पाहण्यासाठी येतात.
विशेष म्हणजे ही मोठी चपाती बनवण्यासाठी एक नव्हे तर अनेक महिलांना एकत्र यावे लागते. मग अनेक तासांच्या मेहनतीनंतर ही चपाती तयार केली जाते. यासाठी भरपूर गव्हाचे पीठ लागते. जेव्हा ही चपाती तयार होते तेव्हा तिचे वजन सुमारे १४५ किलोपर्यंत असते. ही चपाती बनविण्यासाठी मंदिर समितीने खास तवा देखील बनवला आहे.