मैत्री, रहस्य आणि अनपेक्षित कलाटणी देणारी कथा असलेला ‘गुलाम बेगम बादशहा’ हा नवा चित्रपट अल्ट्रा झकासच्या ओटीटी मंचावर प्रदर्शित होणार आहे. १२ जूनला या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर साजरा होईल.
या नव्या सस्पेन्स थ्रिलरमध्ये ३ मित्रांची कथा आहे. ती विक्रम (भरत जाधव), समीर (संजय नार्वेकर) आणि लोरा (नेहा पेंडसे) यांच्याभोवती फिरते. लोरा ही चित्रसृष्टीत धडपडणारी अभिनेत्री, तर विक्रम पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो. अन् समीर नामांकित वृत्तपत्राचा पत्रकार असतो. बिकट परिस्थीतीमुळे या तिघांनाही चांगले पैसे कमवायचे असतात. त्यासाठी ते वेगवेगळे मार्ग शोधत असतात. पण एका पुजारीच्या आगमनाने कथेला वेगळी कलाटणी मिळते. तो खरा पुजारी आहे की रहस्यमय पात्र आहे, याचा पुढे उलगडा होतो. अन् पैशांचे मार्ग शोधता शोधता, या ३ मित्रांच्या मैत्रीवर काय परिणाम होतो, हे या नव्या चित्रपटात पाहायला मिळेल.
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.