Close

केवळ बॉलिवूडच नव्हे तर टीव्ही कलाकारांनीही राम मंदिरासाठी दिलीय देणगी, पाहा कोण आहेत हे कलाकार (Gurmeet Chaudhari, Mukesh Khanna Donate Money For Ayodhya Ram Mandir Construction)

संपूर्ण भारत देश ज्या क्षणाची वाट पाहत होते तो दिवस आज अखेर आला आहे. २२ जानेवारीला ५०० वर्षांची प्रतिक्षा पूर्ण होत आहे. अयोध्यापती रामाची आज या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या मंदिराचे बांधकाम निकाल लागल्यापासून युद्धपातळीवर सुरु झाले होते. बांधकाम खर्चिक असल्यामुळे या मंदिराला बऱ्याच सिनेतारक तसेच टीव्ही कलाकारांनी देणग्या दिलेल्या.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, राम मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत ११०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. काम पूर्ण करण्यासाठी अजून ३०० कोटी रुपये लागतील. मंदिरासाठी अनेकांनी देणगी दिली आहे.

अक्षय कुमारने देणगी दिली

२०२१ मध्ये अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर करून राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी देऊन छोटीशी सुरुवात केल्याचे सांगितले होते. लोक यात कसे योगदान देऊ शकतात हेही त्याने सांगितले. अभिनेत्याने लिहिले होते की, 'आपल्या श्रीरामाच्या भव्य मंदिराचे अयोध्येत बांधकाम सुरू झाले ही आनंदाची बाब आहे. आता आपले योगदान देण्याची पाळी आहे. मी सुरुवात केली आहे, आशा आहे की तुम्हीही आमच्यात सहभागी व्हाल. जय सिया राम.'

अनुपम खेर

अनुपम खेर यांनी २०२३ मध्ये इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ते अयोध्येला गेले होते आणि तिथून एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओत अनुपम यांनी बांधकामादरम्यानची एक झलक दाखवण्यात आली. रिपोर्ट्सनुसार, त्यांनीही काही रक्कम दानही केली आहे.

प्रणिता सुभाष

प्रणिता सुभाष यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती.

मुकेश खन्ना

'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना यांनी ट्विट करून मंदिराच्या बांधकामासाठी १.१ लाख रुपयांचा धनादेश दिल्याचे सांगितले होते. ही रक्कम त्यांनी त्या भागातील आमदाराकडे सुपूर्द केल्याची माहिती खुद्द अभिनेत्यानेच दिली आहे.

हेमा मालिनी यांचे योगदान

पवन कल्याण यांनी ३० लाख रुपयांची देणगी दिली होती. हेमा मालिनी, गुरमीत चौधरी, मनोज जोशी यांनीही मंदिराच्या बांधकामासाठी काही रक्कम दान केली. मात्र त्या रक्कमेचा आकडा त्यांनी जाहीर केला नाही.

Share this article