Close

कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची काळजी घेणाऱ्या बॉयफ्रेंड रॉकी जायसवालचं चाहत्यांकडून होतंय कौतुक (Hina Khan Boyfriend Rocky Jaiswal Cooked Her Favourite Meal Who Suffering from Cancer)

अभिनेत्री हिना खान सध्या तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरचा सामना करत आहे. कठीण काळात हिनाची आई आणि तिचा बॉयफ्रेंड तिची काळजी घेताना दिसत आहे. आई तर कधीच मुलांची साथ सोडत नाही. पण हिनाचा बॉयफ्रेंड ज्याप्रकारे अभिनेत्रीची काळजी घेत आहे, ते पाहून हिनाचे चाहते बॉयफ्रेंड रॉकी जायसवालचं कौतुक करत आहेत. रॉकी कठीण काळात देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून गर्लफ्रेंड हिनावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतोय. आता देखील रॉकीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. शिवाय त्याने हिनाचे तीन फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सोशल मीडियावर रॉकी याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

रॉकी याने पोस्ट केकेल्या फोटोंमध्ये हिने एका हतात चमचा तर दुसऱ्या हातात क्रॅब क्रॅकर पकडले आहेत. रॉकी अभिनेत्रीचे फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘जेव्हा ती हसते तेव्हा संपूर्ण जग प्रकाशीत झाल्यासारखं वाटतं… जेव्हा ती हसते तेव्हा जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं… जेव्हा ती माझ्यासोबत असते, तेव्हा मला आणखी जगावसं वाटतं… यापेक्षा अधिक काहीही महत्त्वाचं नाही…’

रॉकी पुढे म्हणाला, ‘प्रेमासाठी विकेंड फार खास आहे. कारण मी तिच्यासाठी तिच्या आवडीचे पदार्थ बनवत आहे…’ यावर हिना खानने देखील कमेंटच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केलं आहे. रॉकीची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत हिना हिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

रॉकी आणि हिना यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ मालिकेत एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं. त्यानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ मालिकेपासून हिना – रॉकी एकमेकांना डेट करत आहेत. दोघांमधील प्रेम पाहिल्यानंतर ‘प्रेम असावं तर असं…’ यांसारख्या कमेंट करत नेटकरी रॉकीचं कौतुक करत आहेत.

सांगायचं तर, २८ जून रोजी हिना खानने कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. आयुष्यातील कठीण काळ असताना सुद्धा हिना धैर्याने आणि आशावादाने सामना करत आहे. तेव्हापासून सर्वजण अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Share this article