काही दिवसांपूर्वी हिनाने तिला स्टेज ३ स्तनाचा कर्करोग असल्याचे आपल्या चाहत्याशी शेअर केले. आता तिने तिचे केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत तिने हृदयस्पर्शी पोस्टही शेअर केली.
'माझ्या आईचा पाठीमागे काश्मिरी भाषेतला आवाज तुम्हाला ऐकू येईल कारण तिने स्वत:ला हे सर्व पाहण्यासाठी तयार केले आहे ज्याची तिने आयुष्यात कधीच कल्पनाही केली नव्हती. या हृदयद्रावक भावनांसाठी शब्द नाहीत.
तिने पुढे लिहिले, 'येथील सर्व सुंदर लोकांसाठी, विशेषत: ज्या महिला माझ्यासारखाच लढा देत आहेत त्यांच्यासाठी..... मला माहित आहे की हे कठीण आहे, मला माहित आहे की आपल्यापैकी बहुतेकांसाठी आपले केस म्हणजे तो मुकुट असतो जे आपण कधीच काढू इच्छित नाही. पण जर तुम्ही इतका कठिण सामना करत असाल की त्यात तुम्हाला तुमचे केस गमवावे, तुमचा अभिमान, तुमचा मुकुट गमवावाच लागेल ? तुम्हाला जिंकायचे असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आणि मी जिंकणे निवडले.
या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिले आहे की, 'ही लढाई जिंकण्यासाठी मी स्वत:ला प्रत्येक परिस्थित संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझे सुंदर केस गळून पडण्याआधी त्यांना स्वत:हून दूर करते. हा मानसिक ताण मला कित्येक आठवडे सहन करायचा नव्हता. म्हणून, मी माझा मुकुट काढण्याचा निर्णय घेतला कारण मला समजले की माझा खरा मुकुट म्हणजे माझे धैर्य, माझे सामर्थ्य आणि माझे स्वतःवरील प्रेम आहे. आणि हो.. या टप्प्याला सामोरे जाण्यासाठी मी माझ्या केसांचा चांगला विग बनवण्याचा विचार केला आहे. केस परत वाढतील, भुवया परत वाढतील, जखमा पुसट होतील, परंतु आत्मा सदृध राहिला पाहिजे.'
हिनाने शेवटी लिहिले की, 'मी माझी कथा, माझा प्रवास रेकॉर्ड करत आहे, मी स्वत: ला स्वीकारण्याचा माझा प्रयत्न सर्वांपर्यंत पोहोचते. जर माझ्या गोष्टीतला या वेदनादायक अनुभवाचा एक दिवसही एखाद्यासाठी चांगला बनवला तर ते त्याचा नक्कीच फायदा होईल.