Close

आमिर खानने कसं लपवलं त्याचं तिसरं अफेअर, स्वत:च केला खुलासा (How Aamir Khan Hidden New Love Story With Gauri Spratt)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने नुकताच त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला, त्यानिमित्त त्याने तिसऱ्यांदा बेंगळुरूच्या गौरी स्प्राटच्या प्रेमात पडल्याची कबुली दिली. या प्रेम प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आमिर खानने एका मुलाच्या आईसोबतची त्याची प्रेमकहाणी कशी लपवली.

नुकताच आमिर खानने त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या ६० व्या वाढदिवसापूर्वी, आमिरने गौरी स्प्राटसोबतच्या त्याच्या नात्याची पुष्टी केली. पण त्याआधी, अभिनेत्याने एक प्री-बर्थडे सेलिब्रेशन आयोजित केले. ज्यामध्ये त्याने गौरीची ओळख मीडियाशी करून दिली. गौरीची ओळख करून देताना आमिरने सांगितले की त्याच्या कुटुंबाला त्याची नवीन गर्लफ्रेंड आवडली आहे.

आमिर खानने त्याचे नाते मीडियापासून कसे लपवून ठेवले, या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसापूर्वीच्या सेलिब्रेशनमध्ये दिले. अभिनेत्याने गमतीने मीडियातील लोकांना सांगितले, "पाहा, मी तुम्हाला काहीही कळू दिले नाही." ती बंगळुरूमध्ये राहते आणि मी तिला भेटायला तिथे जायचो. तिथे मीडियाचे लक्ष कमी आहे. म्हणूनच आम्ही माध्यमांच्या नजरेआडून भेटत राहिलो.

गौरी मुंबईत आली आणि आमिरच्या कुटुंबाला भेटली आणि त्यानंतरच अभिनेत्याने त्यांचे नाते सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. अभिनेता म्हणाला- आम्ही आता कमिटेड आहोत. आम्ही एकमेकांबाबत सुरक्षित आहोत, म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या नात्याबद्दल सांगायचे ठरवले. आता हे करायला हरकत नाही कारण मला आता गोष्टी लपवाव्या लागत नाहीत.

गौरीने आमिरच्या कुटुंबाला भेटण्याचा तिचा अनुभवही माध्यमांसोबत शेअर केला. गौरीने सांगितले की, आमिरच्या कुटुंबाने तिचे खुल्या मनाने आणि मोठ्या प्रेमाने स्वागत केले.

 गौरी स्प्राट बेंगळुरूमध्ये राहते. व्यवसायाने ती बॅकग्राउंड हेअरड्रेसिंगचे काम करते. तिने लंडनमधील कला विद्यापीठातून फॅशन, स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये एफडीए केले आहे. तिला एक ६ वर्षांचा मुलगा देखील आहे. आमिर खान त्याला गेल्या २५ वर्षांपासून ओळखतो. सध्या ती आमिर खान फिल्म्समध्ये काम करत आहे.

Share this article