पहिली पत्नी सुझान खान हिला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन, सबा आझाद हिला डेट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सबा आणि हृतिक एकत्र आहेत. दोघेही बऱ्याचदा एकत्र स्पॉट होतात आणि त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता सबा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सबा आझाद हिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे सबा प्रेग्नंट आहे का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

त्याचं झालं असं की, सबाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर तुमचा स्त्रीरोगतज्ञ कोण आहे ( WhosYourGynac?) असे लिहिले आहे. हा फोटो शेअर करताना सबाने लिहिले - 'सध्या फक्त हाच प्रश्न माझ्या मनात फिरत आहे.'
सबा आझाद हिच्या या सोशल मीडिया पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ज्यूनियर हृतिक येणार आहे का?’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आधी लग्न कर त्यानंतर गायनॅककडे जा..’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सबा आई होणार आहे का?’ एवढंच नाही तर, अनेकांनी सबा हिच्या पोस्टवर कमेंट करत अभिनेता हृतिक रोशन याला देखील टॅग केलं आहे.
सध्या रंगत असलेल्या चर्चांवर हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हृतिक याच्या स्पष्टीकरणाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.. सर्वत्र हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

सबा आझाद देखील एक अभिनेत्री आहे. सबा बिने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल कब्बडी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एवढंच नाही तर अनेक लघूचित्रपटांमध्ये देखील हृतिक याच्या गर्लफ्रेंडने काम केलं आहे. अभिनयासोबतच सबा हिला संगीत क्षेत्रात देखील सक्रिय आहे. अभिनेते नसीरुद्दीन शाह याच्या मुलगा इमाद शाह याच्यासोबत सबा ‘मॅडबॉय/ मिंक’ बॅन्डमध्ये देखील काम करते. सबा आझाद हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, हृतिक याची गर्लफ्रेंड वर्षाला तब्बल ५ ते ७ कोटी रुपयांचा कमाई करते. सोशल मीडियावर देखील सबा कायम सक्रिय असते… हृतिक रोशन सध्या दीपिका पदुकोणसोबत सिद्धार्थ आनंदच्या एरियल अॅक्शन चित्रपट 'फायटर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर वॉर 2 मध्येही तो दिसणार आहे.