यशराज फिल्मचा पुढील सिनेमा वॉर २ ची सध्या जोरदार चर्चा आहे. यामध्ये आता हृतिक रोशनचा अक्शन लूक पाहायला मिळेल. याशिवाय या बॅनरचा टायगर ३ हा सिनेमादेखील थिएटरमध्ये सुरु आहे.
स्पाय सीरिजचा वॉर २ चित्रपट २६ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होऊ शकतो असे बोलले जात होते. मात्र आता या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे. हृतिक रोशनचा 'वॉर २'च्या रिलीजबाबत बातमी समोर आली आहे, त्यात असे म्हटले आहे की हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ ला रोजी रिलीज होणार आहे.
१४ ऑगस्ट म्हणजे पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. अयान मुखर्जी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे त्यांनी यापूर्वी ब्रमास्त्राचे दिग्दर्शन केले होते. वॉर २ या चित्रपटाला लाँग वीकेंडचा फायदा मिळावा यासाठी १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. यापूर्वी YRF चे स्पाय युनिव्हर्सचे चार चित्रपट 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार', 'पठाण' आणि 'टायगर 3' रिलीज झाले आहेत.
वॉर २ मध्ये हृतिक रोशन, टायगर श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.