Close

हुमा करेशीने सोनाक्षीच्या लग्नात पार पाडली मेहुणीची भूमिका(Huma Qureshi Perform The Ritual Of Sister In Law In Sonakshi Zaheer Khan Wedding)

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या जोडप्याच्या ग्रॅण्ड रिसेप्शनला बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी हजर होते.

सोनाक्षी आणि झहीरच्या रिसेप्शनला सलमान खान, काजोल, रेखा, सायरा बानो यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. सेलेब्सच्या सहभागाची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत. चाहतेही या फोटो आणि व्हिडिओंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

पण सोना आणि झहीरच्या लग्नात हुमा कुरेशीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हुमा ही केवळ सोनाक्षीची बेस्ट फ्रेंड नाही तर तिने अभिनेत्रीच्या लग्नात मेहूणीची भूमिकाही साकारली होती.

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला हुमा तिचा भाऊ साकिब आणि आईसोबत आली होती.

रिसेप्शनच्या या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि झहीरचे जवळचे मित्र वधू-वरांसोबत खूप मस्ती करताना आणि पोज देताना दिसत आहेत.

हे फोटो बघून अंदाज लावता येतो की त्याच्या मित्रांना किती मजा आली असेल.

Share this article