Close

काव्याच्या सेटवर थाटात साजरा झाला सुंबुल तौकिरचा २० वा वाढदिवस, वडीलांनी खास लेकीसाठी सेटवर लावलेली हजेरी (Imali fame Sumbul Touqeer Khan Celebrates Her 20th Birthday On The Sets Of Kavya)

इमली या टीव्ही शोमधून लोकप्रिय झालेली सुंबुल आज टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. तिने टीव्ही शो इमलीमध्ये स्वत:ला सिद्ध केले होते. त्यानंतर बिग बॉस 16 मध्ये तिचे व्यक्तिमत्व पाहायला मिळाले. आजकाल सुंबूल टीव्ही शो काव्या- एक जज्बा, एक जुनूनमध्ये दिसत आहे. शोला चांगली ओपनिंगही मिळाली आहे.

या शोच्या सेटवर, अभिनेत्रीने तिचा 20 वा वाढदिवस सहकलाकार आणि वडील तौकीर हसन खान आणि बहीण सानिया यांच्यासोबत साजरा केला.

सुंबुलला तिच्या चाहत्यांनी एक अनोखा केक पाठवला होता ज्यामध्ये तिच्या नावाची अक्षरे होती. अभिनेत्रीच्या बहीण आणि वडिलांनी  स्वत:च्या हाताने केक सजवला. सुंबूलनेही सर्वांसमोर मजेदार पद्धतीने केक कापून आधी वडिलांना खाऊ घातला. यावेळी, सुंबुलने निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि ती तिच्या पात्राच्या म्हणजेच काव्यामधील काव्याच्या लूकमध्ये होती.

तिचे वडील देखील जोरदार टाळ्या वाजवत होते आणि आपल्या मुलीसाठी वाढदिवसाचे गाणे गात होते. सुंबूलसाठी तिचे वडील खूप जवळचे आहेत.  ती फक्त 6 वर्षांची असताना तिचे पालक वेगळे झाले आणि तिच्या वडिलांनी सिंगल पालक म्हणून त्यांचे पालनपोषण केले.

सुंबुलने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे - बाल वीर, अकबर बिरबल, गंगा, जोधा अकबर, ती डीआयडी लिटिल मास्टर्स या डान्सिंग शोमध्ये देखील दिसली आहे, परंतु तिला इमलीच्या मुख्य भूमिकेतून ओळख मिळाली.

सुरुवातीला तिला तिच्या गडद रंगामुळे खूप ट्रोल केले गेले. अशी गडद मुलगी मुख्य भूमिका कशी करू शकते असे तिच्याबद्दल म्हटले होते., परंतु तिच्या अभिनयाने सर्वांनाच थक्क केले. सुंबूलने 2019 मध्ये आयुष्मान खुरानाच्या 'आर्टिकल 15' चित्रपटातही काम केले होते आणि आज ती टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.

Share this article