Close

आमिर खानचा भाचा इम्रान खान गर्लफ्रेंड लेखासोबत राहणार करण जोहरच्या घरात, महिन्याला आकारणार एवढे भाडे… (Imran Khan And GF Lekha Washington To Rent Karan Johar’s Swanky Three-Storey Apartment For A Whopping Rs 9 Lakhs Per Month)

बॉलिवूडमध्ये एखाद्या सेलिब्रिटी कपलचं घटस्फोट होणं नवीन गोष्ट नाही… घटस्फोट झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला, तर काहींनी मात्र लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार केलेला दिसतो. झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये आहेत. यामध्ये आता एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे आमिर खान याचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान. पहिली पत्नी अवंतिका मलिक हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात लेखा वाशिंगटन हिची एन्ट्री झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून इम्रान आणि लेखा एकमेकांना डेट करत आहेत. आता अभिनेता गर्लफ्रेंड लेखा हिच्यासोबत पुन्हा नवीन सुरुवात करणार आहे. अभिनेत्याने मुंबईतील वांद्रे याठिकाणी घर भाड्याने घेतलं आहे. इम्रान याने बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याचं घर भाड्याने घेतलं आहे.

इम्रान आणि गर्लफ्रेंड लेखा ही दोघं आता करण जोहर याच्या घरात राहणार आहेत. ज्यासाठी त्यांना दर महिन्याला भाडं म्हणून ९ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. सांगायचं झालं तर, लेखा हिच्यासोबत भाड्याने घर घेण्यापूर्वी इम्रान वांद्रे याठिकाणी असलेल्या स्वतःच्या बंगल्यात राहत होता.

रिपोर्टनुसार इम्रान आणि लेखा आता प्रसिद्ध कार्टर रोडवरील क्लिफपेट येथील तीन मजली अपार्टमेंटमध्ये राहणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इमरान – लेखा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्याने लेखा हिच्यासोबत असलेल्या नात्याची अधिकृत घोषणा देखील केली आहे.

इम्रान याच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं नाव अवंतिका मलिक असं आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर देखील दोघांमधील वाद मिटले नाहीत. अखेर इम्रान आणि अवंतिका यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये इम्रान आणि अवंतिका याचा घटस्फोट झाला आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/