येत्या ईदच्या मुहूर्तावर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाचे जय्यत प्रमोशन सिनेमाच्या टीमकडून होत आहे. पुढील महिन्यात १० एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर त्याचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दोन्ही अभिनेते जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहेत.
नुकतीच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४' मध्ये हजेरी लावलेली. तेव्हा अक्षयला ' अमेरिकेत कलाकारांच्या बॉडी डबल्सना किंवा ॲक्शन करणाऱ्यांना खूप ओळख मिळते, पुरस्कार मिळतो. जर त्यांनी त्यांच्या देशाचा गौरव केला तर त्यांच्या देशातले सरकार त्यांना प्रमोट करते. या चित्रपटात तू चुलुकचा वापर केला आहेस. अशी भावना आणि प्रोत्साहन भारतातही यायला हवं असे वाटतं का? असा प्रश्न विचारला
यावर अक्षय कुमारने 'हो, अगदीच. उत्तर दिले,' तो पुढे म्हणाला की, आपण लहानपणापासून चित्रपट पाहत आलो आहोत. आणि ही गोष्ट आपल्या मनात बिंबवली गेली आहे की जर कोणी दहशतवादी हल्ला केला तर अमेरिका आपल्याला वाचवेल, कारण आपण नेहमीच हॉलिवूडचे चित्रपट पाहत आलो आहोत. एलियन आले तर कोण वाचवणार? अमेरिका वाचवणार. कोणावरही कुठूनही हल्ला झाला तर सर्वांसाठी अमेरिकाच उपाय शोधणार. मला ही गोष्ट बदलायची आहे. काहीही झाले तरी भारत वाचवेल. मला तेच करायचे आहे. सरकारला माझी विनंती आहे की आम्हाला संधी द्या, आम्हाला आमच्या हवाई दल आणि लष्कराकडून खूप काही मिळते. पण त्याहून अधिकची अपेक्षा आहे. आम्हाला हेही दाखवायचे आहे की आयुष्यात काहीही झाले तरी भारत आपल्याला वाचवेल आणि भारत वाचवू शकतो.