Close

राज कपूर यांचा नातू आदर जैन याने गर्लफ्रेंड आलेखाला लग्नासाठी केलं प्रपोज (In Kapoor Family Aadar Jain Proposes Girlfriend Aalekha Advani)

राज कपूर यांचा नातू आदर जैन विवाहबंधनात अडकणार असून नुकतंच त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला अतिशय रोमँटिक होत प्रपोज केलं आहे. हे पाहता कपूर घराण्यात लवकरच सनई चौघडे वाजणार हे निश्चित. राज कपूर यांचा नातू आणि रणबीर, करीना, करिश्मा यांचा चुलत भाऊ आदर जैन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच त्याने गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीला लग्नासाठी प्रपोज केलंय.

आलेखा आणि आदर हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याआधी आदर हा अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. ताराशी ब्रेकअप झाल्यानंतर तिच्याच मैत्रिणीला आदरने प्रपोज केलं आहे. आदर जैनने आलेखाला प्रपोज करतानाचे फोटो पोस्ट करताच त्यावर करीना आणि करिश्मा कपूर बहिणींनी कमेंट्स केल्या आहेत. 'मेहंदी लगा के रखना.. डोली सजा के रखना', अशी कमेंट करीना कपूरने केली आहे. करिश्मानेही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आलेखा ही तारा आणि आदर या दोघांची खास मैत्रीण होती. एका जुन्या फोटोमध्ये तिने आदर आणि ताराच्या नात्यात 'थर्ड व्हिल' (तिसरी चाक) असल्याचं म्हटलं होतं. तर आदरने प्रपोजलच्या पोस्टमध्ये आलेखाला त्याची 'फर्स्ट क्रश' असं म्हटलंय.

आदर जैन हा राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा मुलगा आहे. रणबीर कपूर, करीना आणि करिश्मा कपूर यांचा तो चुलत भाऊ आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा होती.

Share this article