बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आज त्याची दीर्घकाळची मैत्रीण लिन लैश्रामसोबत इंफाळमध्ये लग्न करणार आहे. लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवरी मुलीच्या मित्रांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी सोशल मीडियावर लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. लिन लैश्रामने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्या मित्रांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी शेअर केलेले फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये रणदीप हुड्डा आपल्या भावी वधूच्या रंगात रंगला आहे.

पहिल्या फोटोत, रणदीप आणि त्याची भावी वधू लिन लाल रंगाची पारंपारिक शाल परिधान केलेल्या मित्रांसोबत पोझ देताना दिसत आहेत. दुस-या फोटोत, ऑफ व्हाइट शर्टसह फिकट निळ्या रंगाची पँट घातलेला रणदिप नाचताना दिसत आहे, तर लिन लिंबू रंगाच्या कॉटन साडीत खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहे. तिसऱ्या फोटोत सर्वजण एकत्र जेवत आहेत.

रणदीप हुड्डा आणि मणिपुरी मॉडेल कम अभिनेत्री लिन लैश्राम एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. आता लव्हबर्ड्सनी त्यांचे नाते पुढच्या पातळीवर नेण्याचा विचार केला. गेल्या आठवड्याच्या शेवटी, या जोडप्याने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली.