बॉलिवूडचा आवडता अभिनेता वरुण धवनच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. त्याची पत्नी नताशा दलाल गरोदर असून लवकरच ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. हे जोडपे पालक होण्यासाठी खूप उत्सुक आहे.
नताशाची कधीही प्रसुती होऊ शकते. त्यामुळे काल म्हणजेच 21 एप्रिल रोजी वरुणने त्याच्या पत्नीसाठी एक बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती ज्याचे अनेक फोटो आता व्हायरल होत आहेत. वरुण धवनने स्वत: अद्याप कोणताही फोटो शेअर केला नसला तरी हे फोटो त्याच्या फॅन पेजवर व्हायरल झाले आहेत.
नताशा दलालचा बेबी शॉवर हा एक अतिशय खासगी सोहळा होता, ज्यामध्ये फक्त तिचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. तिच्या बेबी शॉवर समारंभात, नताशाने पांढरा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती तिचे बेबी बंप फ्लाँट करताना दिसली होती. अगदी साध्या लूकमध्येही नताशा खूपच क्यूट दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत होती. वरुण धवनही पत्नीसोबत मॅचिंग केले होते.
या प्रसंगी आई-बाबा वरुण आणि नताशा यांनी फुलांनी सजवलेला दोन थरांचा केक कापला, ज्यावर टेडी बेअर ठेवण्यात आला होता. या केकचा फोटो सर्वप्रथम शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने सोशल मीडियावर शेअर केला होता. केक कटिंगच्या वेळी वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन आणि आई देखील उपस्थित होते. ते आजी-आजोबा होण्यासाठी खूप उत्सुक दिसत होते.
नताशा आणि वरुणने बेबी शॉवरमध्ये कुटुंब आणि मित्रांसोबत क्लिक केलेले बरेच फोटोही पाहायला मिळाले. फंक्शननंतर, जोडप्याने पापाराझींना मिठाई आणि भेटवस्तू देखील वाटल्या.
वरुण धवनने 18 फेब्रुवारीला नताशासोबत इंस्टाग्रामवर घोषणा केली होती की ते पालक होणार आहेत. अभिनेत्याने त्याची पत्नी नताशा दलाल तिच्या बेबी बंपचे चुंबन घेतानाचा एक काळा आणि पांढरा फोटो पोस्ट केला होता, ज्याच्या कॅप्शनमध्ये वरुणने लिहिले होते, आम्ही प्रेग्नंट आहोत. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम हवे आहे.