साहित्यः डोसा बनविण्यासाठीः १ कप ओट्स (जरा जाडसर वाटून घ्या), प्रत्येकी २-२ टेबलस्पून सुजीचा रवा आणि तांदळाचं पीठ, अर्धा कप ताक, ४ टीस्पून तेल, १ पॅकेट फ्रूट सॉल्ट, चवीनुसार मीठ.
स्टफिंगसाठीः५ बटाटे (उकडून स्मॅश करून घ्या), २ टेबलस्पून मटार, थोडी कोथिंबीर चिरलेली, ४हिरव्या मिरच्या चिरून, चवीनुसार मीठ, १ टीस्पून आल्याची पेस्ट, पाव टीस्पून राई, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून धणे पूड आणि पाव चमचा लाल मिरची पावडर, कढिपत्तची पानं.
कृतीः स्टफिंगसाठीः एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात राई आणि कढिपत्त्याची फोडणी द्या.त्यात आल्याची पेस्ट घालून परतून घ्या.नंतर हळद, धणे पूड आणि मटार घालून मटार मऊ होईर्पंत शिजवा. उरलेलं सर्व साहित्यत्यात घालून २मिनिटं मिश्रण परता आणि आचेवरून खाली घ्या.
डोसा बनवितानाः ओट्स, सुजी आणि तांदळाचे पीठ एकत्र करून ताका मध्ये ३० मिनिटांकरिता भिजवून ठेवा. त्यात मीठ आणि फ्रुट सॉल्ट घालून फेटून घ्या. नंतर नॉनस्टिक पॅनवर १ टेबलस्पून डोशाचं पीठ पसरवून घ्या.त्यावर स्टफिंग ठेवून मंद आचेवर डोसा क्रिस्पी होईस्तोवर शिजवा. तयार मसाला डोसा, सांबर आणि खोबऱ्याची चटणीसोबत सर्व्ह करा.