शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टी अनेक सिनेतारकांनी उपस्थिती लावली होती. पण यासर्वात अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि रॅपर बादशाह थोडे विशेष आकर्षण ठरले. या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मृणाल आणि बादशाह पार्टीतून हातात हात धरून बाहेर जाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ Reddit वर शेअर करताना एका युजरने लिहिले की, ' ते डेटिंग करत आहेत का? असा प्रश्न विचारला आहे' त्यानंतर अनेकांनी त्या क्लिपवर प्रतिक्रिया दिली आणि ते दोघे डेट करत असल्याचा अंदाज लावला.
https://x.com/scrollandplay/status/1723623324058869764?s=20
मृणाल ठाकूर आणि बादशाह हातात हात धरुन पार्टीतून बाहेर पडताना दिसले. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोक त्यांच्या डेटिंगचा अंदाज लावत आहेत. पार्टीत मृणालने हिरवा लेहेंगा घातला होता, तर बादशाह काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये हॅण्डसम दिसत होता, तो पार्टीतून बाहेर पडताना तिच्या मागे चालत होता. मृणालने इन्स्टाग्राम स्टोरीजवर पार्टीमधील स्वतःचे आणि बादशाहचे अनेक फोटो शेअर केले आहेत. दिवाळी पार्टीच्या काही फोटोंमध्ये ते दोघेही शिल्पा शेट्टीसोबत आहेत.
एका Reddit वापरकर्त्याने लिहिले, 'मला त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. ' दुसरा म्हणाला, 'त्याचे लग्न झाले आहे आणि त्याला एक मूलगी ही आहे?' बादशाहचे पहिले लग्न जस्मिन मसिहशी झाले होते आणि २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांची मुलगी जेसी ग्रेस मसिह सिंहचा जन्म जानेवारी २०१७ मध्ये झाला.