बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा बोलबाला आहे. हे स्टार किड्स त्यांच्या कामामुळे कमी अन् खासगी आयुष्यातील लव्ह स्टोरीज मुळेच अधिक प्रसिद्ध होत आहेत. ते कायम चर्चेत असतात. शिवाय त्यांचे अनेक खासगी फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता देखील ‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री हिच्या मुलाची लव्हस्टोरी चर्चेत आहे. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे, शुटिंगच्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम बहरलं असं सांगण्यात येत आहे…
अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यू दसानीच्या बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत वाढत असलेल्या भेटी भलत्याच चर्चेचा विषय ठरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अभिमन्यू ‘द फॅमेली मॅन’ वेब सीरिजमधील अभिनेत्री श्रेया धन्वंतरी हिला डेट करत असल्याचे समजते.
श्रेया आणि अभिमन्यू ‘नौसिखिये’ या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. दोघांनी भोपाळ याठिकाणी सिनेमाचं शुटिंग केलं असून रिपोर्टनुसार, भोपाळमध्ये शुटिंगसाठी दोघे जवळपास एक महिना एकत्र होते. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं असं सांगण्यात येत आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘लस्ट स्टोरीज २’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान दोघांना एकत्र पाहिलं होतं. स्क्रिनिंग दरम्यान दोघांनी एकत्र फोटो देखील क्लिक केलं. पण अद्याप दोघांनी देखील नात्याची कबुली दिली नाही.
अभिमन्यू याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘मर्द को दर्द नही होता’ सिनेमातून अभिमन्यूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘मर्द को दर्द नही होता’ सिनेमानंतर अभिमन्यू याने ‘निकम्मा’, ‘मिनाक्षी सुंदरेश्वर’, ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात अभिमन्यू आई भाग्यश्री आणि अभिनेता सलमान खान याच्यासोबत दिसला.
तर श्रेया धन्वंतरीने ‘चुप’, ‘लूप लपेटा’ आणि ‘व्हाय चीट इंडिया’ इत्यादी सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. एवढंच नाही तरी, श्रेयाने ‘स्कॅम १९९२’ मध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. सध्या श्रेया आणि अभिमन्यू त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहे.