छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी आणि कुशल टंडन या दोघांनी बरसातें- मौसम प्यार का या मालिकेत काम केलं आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री पाहून त्यांच्या चाहत्यांना अनेकदा वाटलं की ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. दरम्यान, यावर शिवांगी किंवा कुशलनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता असं म्हटलं जातंय की दोघांनाही त्यांच्या नात्यावर शिक्का मोर्तब करायचा आहे.
शिवांगी जोशी आणि कुशल टंडन ही दोघं या मालिके दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. सध्या दोघंही त्यांच्या नात्याविषयी गंभीर असून, त्यांच्यातील नात्याला पुढे घेऊन जाण्याच्या विचारात आहेत. असं म्हटलं जातं की शिवांगी आणि कुशल लवकरच लग्न बंधनात अडकण्याचा विचार करत आहेत. दोघांनी आतापर्यंत त्यांच्या नात्याविषयी लपवलं कारण त्यांना त्यांचं खासगी आयुष्य हे खासगीच ठेवायचं होतं. त्यांना त्यांच्या नात्याची घोषणा ही योग्यवेळी करायची होती. या बातमीवर शिवांगी किंवा कुशालनं दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे आता या बातमीत किती सत्य आहे आणि किती अफवाह आहे याविषयी ते दोघेच सांगू शकतात.
शिवांगी आणि कुशल यांच्यात वयाचा खूप फरक आहे. कुशल हा शिवांगीपेक्षा वयानं १४ वर्षांनी मोठा आहे. तर कुशलच्या पास्ट रिलेशनशिपविषयी बोलायचे झाले तर तो आधी गौहर खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता.
दरम्यान, शिवांगी विषयी बोलायचे झाले तर तिचं नाव आधी बालिका वधू २ चा को-स्टार रणदीप रायशी जोडण्यात आलं होतं. दरम्यान, २०२२ मध्ये शिवांगीनं या अफवाह असल्याचे स्पष्ट केलं आणि म्हटलं की आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. शिवांगीला खरी लोकप्रियता ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून मिळाली. त्या मालिकेत शिवांगीनं नायरा ही भूमिका साकारली होती. त्या मालिकेत शिवांगी आणि मोहसिन खान यांची जोडी पाहायला मिळाली होती. त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. पण काही काळानंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाऊ लागले.