अंबानी कुटूंबाची लाडकी लेक ईशा आणि तिचा नवरा आनंद पिरामल यांनी त्यांचं लॉस एंजेलिसमधील आलिशान घर हॉलिवूडमधील एका सुप्रसिद्ध जोडप्याला विकलं.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड प्री वेडिंग सोहळ्यानंतर अंबानी कुटूंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अंबानी कुटूंबाची लाडकी लेक ईशा आणि तिचा नवरा आनंद पिरामल यांनी त्यांचं लॉस एंजेलिसमधील आलिशान घर हॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि तिचा नवरा बेन अॅफेल्क (Ben Affleck) यांना विकलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंद आणि ईशा यांनी जेनिफर आणि बेन यांना त्यांचं लॉस एंजेलिसमधील घर तब्बल ५०० करोड रुपयांना विकलं. गेल्या वर्षीच्या जून महिन्यातच या घराविषयीचा करार ईशा आणि जेनिफर मध्ये झाला होता. लॉस एंजेलिसच्या बेव्हर्ली हिल्समध्ये असलेला हा आलिशान बंगला तब्बल ३८००० स्केअर फूटचा आहे. या बंगल्यात १२ बेडरूम्स, २४ बाथरूम्स, एक पिकलबॉल कोर्ट, जिम, सलोन, स्पा, १५५ फूट लांबीचा इनफिनिटी स्विमिंग पूल, एक आउटडोअर किचन आणि बंगल्याबाहेर सुंदरसे गार्डन यासोबतच मनोरंजनाचा अनेक सुविधांनी सज्ज आहे.
विशेष म्हणजे ईशा या आधी या बंगल्यात वास्तव्यास होती. ती जेव्हा गरोदर होती तेव्हा बराच काळ या बंगल्यात ती राहिली होती. इतकंच नाही तर २०२३ साली हा बंगला तिने प्रियांका चोप्राला एका कार्यक्रमाच्या स्क्रीनिंगसाठी दिला होता.
या बंगल्याची जेनिफर आणि बेन यांनी $६१ मिलियन डॉलर म्हणजे तब्बल ५०० करोडहुन अधिक किंमत मोजल्याचं म्हंटल जातंय. त्यांचा हा करार गेल्या वर्षी जूनमध्ये झाला होता. जेनिफरची सध्याची संपत्ती ३ हजार ३३२ कोटींच्या घरात असल्याचं वृत्त आहे.
जेनिफरचं बेनसोबत चौथं लग्न असून ते बराच काळ डेट करत होते. ते २००० साली एकमेकांना डेट करत होते पण काही काळाने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये ते दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. २०२२ साली या जोडीने लग्नगाठ बांधली. जेनिफरला पुर्वश्रमीच्या पतीपासून दोन जुळी मुलं आहेत तर बेन सुद्धा तीन मुलांचा पिता आहे.