बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती कथित प्रियकर शिखर पहाडियासोबत स्पॉट झाली होती. जान्हवी कपूर हिचा हा व्हिडीओ सोशल मीडिया स्टार ओरीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर तिरुपती मंदिरात दर्शनासाठी जाताना दिसली आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये अभिनेत्री गुडघ्यावर मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तिचे भरभरून कौतुक करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी तिच्या वाढदिवसानिमित्त तिरुपती मंदिरात आवर्जून जाते. दरम्यान, यंदाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ओरीने त्याच्या व्लॉगमध्ये याची झलक दाखवली आहे.
जान्हवीबरोबर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि ऑरीनेदेखील तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. याचा व्हिडिओ ऑरीने त्याच्या युट्यूब चॅनेलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत जान्हवी, शिखर आणि ऑरी तिरुपती मंदिराच्या जवळपास ३००० पायऱ्या चढत बालाजीच्या दर्शनाला गेले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच शेवटच्या काही पायऱ्या ते गुडघे टेकत चढत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
ओरीच्या फन व्लॉगमध्ये दिसत आहे की, जान्हवी कपूर आतापर्यंत किती वेळा तिरुपतीला गेली याचा खुलासा स्वतः करताना दिसली आहे. जान्हवी कपूर आतापर्यंत तब्बल ५० वेळा तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन आली आहे. तर, जान्हवी कपूर हिचा कथित प्रियकर शिखर पहाडिया म्हणत आहे की, ही त्याची तिरुपती बालाजी मंदिराला भेट देण्याची नववी वेळ आहे. तर, ओरी म्हणत आहे की, ही त्याची पहिली वेळ आहे आणि तो देखील मंदिराच्या पायऱ्या चढणार आहे. या व्हिडीओतील जान्हवी कपूरचा साधेपणा चाहत्यांना पसंत पडत आहे.
मंदिराच्या पायऱ्या चढण्यासोबतच ओरी, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्यासोबत दक्षिण भारतीय खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतानाही दिसला आहे. यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूर हिने ओरीला तिरुपती बालाजी मंदिराचं महात्म्य सांगताना म्हणाली की, 'देवाचं दर्शन मिळवण्यासाठी नशीब लागतं, हे सगळ्यांना मिळत नाही. म्हणूनच मला मंदिरात पायऱ्या चढून जायला आवडतं.’
अभिनेत्री जान्हवी कपूर नुकतीच 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने कॅमिओ केला होता. सध्या ही अभिनेत्री साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. लवकरच ती साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत 'देवारा' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, ती राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात झळकणार असून, हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. यासोबतच ती आणखी एका साऊथ चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम, सोशल मीडिया)