मुंबई- झलक दिखला जा या लोकप्रिय टीव्ही शोच्या 11व्या सीझनची सेमीफायनल होणार आहे, मात्र त्याआधीच शोएब इब्राहिम आजारी पडला आहे. अभिनेत्याची पत्नी दीपिका कक्कर हिने पतीची प्रकृती लक्षात घेऊन चिंता व्यक्त केली आहे.
सध्या टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिम 'झलक दिख ला जा 11' च्या सीझनमध्ये आपल्या उत्कृष्ट डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. शोचे सर्व स्तर पार करत शोएबने सेमीफायनल गाठली आहे.
पण अभिनेत्याशी संबंधित एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. मेहनत आणि सरावातून इथपर्यंत पोहोचल्यानंतर शोएब इब्राहिम आजारी पडला आहे.
शोएबची पत्नी दीपिका कक्करने नुकताच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पतीचा एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये शोएब बेडवर झोपला आहे आणि त्याला सलाइन लावली आहे. शोएबच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत पत्नी दीपिकाने लिहिलं आहे- त्याचे मन अजूनही काम करू इच्छित आहे, त्याला आपले सर्वोत्तम द्यायचे आहे, परंतु शरीराने हार मानली आहे, लवकर परत ये माझ्या हिरो.
शोएब इब्राहिम हा 'झलक दिख ला जा-11' च्या सर्वात लाडक्या स्पर्धकांपैकी एक आहे. या शोमध्ये त्याची जोडी अनुराधा अय्यंगारसोबत पाहायला मिळते.