कलश, हिटलर दीदी, देवों के देव महादेव यासह अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन झालं. तिला सर्वायकल कॅन्सरचं निदान झालं होतं. वयाच्या ४८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. डॉली सोहीची बहीण अमनदीप सोही हिचासुद्धा ४८ तासांपूर्वी मृत्यू झालाय.
डॉलीची सर्वायकल कॅन्सरशी झुंज अपय़शी ठरली. तर तिची बहीण अमनदीप हिला कावीळ झाली होती. डॉली सोहीच्या निधनाची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. डॉलीचा भाऊ मनु याने सांगितलं की, डॉलीचं सकाळी निधन झालं. यामुळे आमच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तिच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
डॉली साहूच्या भावाने तिच्या आणि बहिणीच्या निधनाची माहिती दिलीय. अमनदीप सोहीसुद्धा टीव्ही अभिनेत्री होती. दोन दिवसात दोन्ही बहिणींच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमनदीप सोही बदतमीज दिलमधून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अमनदीपचे निधन कावीळीने झाल्याचं मनु सोहीने सांगितलं.
गेल्या काही महिन्यांपासून डॉली सोहीची प्रकृती खालावली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. मुंबईतील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिला सर्वायकल कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं.