Close

राज बब्बर यांच्या मुलीने दोन मुलींचा बाबा असलेल्या अभिनेत्याशी केलंय लग्न; कोण आहे जुही बब्बरचा पती? (Juhi Babbar Reveals Mom Nadira’s Reaction To Her Marriage With Anup Soni)

अभिनेत्री जुही बब्बर ही राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांची मुलगी आहे. ती ‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेता अनुप सोनीची दुसरी बायको आहे. जुही रंगभूमीवर सक्रिय आहे. जुही एका नाटकादरम्यान अनुप सोनीला भेटली होती. त्यावेळी अनुप विवाहित होता, त्याला पत्नी रितूपासून दोन मुली होत्या. २०१० मध्ये रितू व अनुपचा घटस्फोट झाला आणि काही महिन्यांतच २०११ मध्ये अनुपने जुहीशी लग्न केलं. जुहीचं देखील हे दुसरं लग्न होतं. तिचं पहिलं लग्न चित्रपट-निर्माता बिजॉय नांबियारशी झालं होतं. पण अवघ्या दोन वर्षातच २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

अनुप आधीच विवाहित होता, त्याला मुली होत्या, त्यामुळे तिला त्या नात्याबद्दल संकोच वाटला होता का? असा प्रश्न जुही बब्बरला विचारण्यात आला. त्याबद्दल जुही म्हणाली, “आधी दुसरा अभिनेता बेगम जान (नाटकाचे नाव) करत होता, पण आम्हाला अभिनेता बदलावा लागला, त्यामुळे आम्ही काही जणांशी बोललो, त्यापैकीच एक अनुप होता. अनुपला घेतल्याने माझ्या आईला फार आनंद झाला, कारण तो लोकप्रिय अभिनेता होता.”

अनुप व जुहीच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली होती. जुही म्हणाली, “मी असं म्हणेन की आमच्यात चांगली मैत्री होती, पण आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यात सारख्याच परिस्थितीतून जात होतो. तेव्हा आमच्या मित्रांनी आम्हाला याबद्दल विचार करा, असं सुचवलं. तसेच आम्ही एकत्र आलो तर छान होईल, असा सल्ला दिला.”

जुही पुढे म्हणाली, “खूप कठीण होतं, असं मी म्हणणार नाही, पण त्यासाठी खूप विचार केला. खरं तर निर्णय अनुपला घ्यायचा होता, मात्र त्याला माहीत होतं की जेव्हा अशी परिस्थिती असते, तेव्हा दोन लोक कोणत्या गोष्टीतून जात असतात, ते इतर कोणीच समजू शकत नाही. आम्ही पब्लिक फिगर आहोत, त्यामुळे आमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात.” लोक त्यांना वाटेल ते बोलतात, पण तुम्ही ते कसं घ्यायचं ते तुमच्यावर अवलंबून असतं, असं जुही सांगते. अशा परिस्थितीत शांत बसायचं आणि चेहऱ्यावर हास्य ठेवायचं हे मी माझ्या कुटुंबाकडून शिकले आहे, असं जुहीने नमूद केलं.

नादिरा व राज बब्बर यांची जुही व अनुपच्या नात्याबद्दल कशी प्रतिक्रिया होती, खासकरून तिची आई, कारण त्यांनाही असाच काहिसा अनुभव आला होता. राज नादिराबरोबर विवाहित असताना स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते आणि लग्नही केलं होतं. याबाबत जुही म्हणाली, “प्रत्येकच पालक मुलांच्या लग्नाबद्दल घाबरलेले असतात. पण माझ्याबरोबर आधी जे घडलं त्यामुळे त्यांना धक्का बसला होता. त्यामुळे मी दुसऱ्यांदा लग्न करायचं ठरवल्यावर त्यांना काळजी वाटत होती आणि या नात्यात सगळं परफेक्ट होतं असं नाही. पण त्यांना माझ्यावर विश्वास होता, अनुपवर होता. तो विश्वास अनुपने निर्माण केला होता.”

जुही व अनुप यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली असून त्यांना इमान नावाचा मुलगा आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/