करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट आणि सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. आजही राहुल, अंजली आणि टीना यांची प्रेमकहाणी आणि मैत्रीच्या आठवणी चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत.
'कुछ कुछ होता है'मध्ये काजोलने शाहरुखच्या बेस्ट फ्रेंडची भूमिका साकारली होती तर अभिनेत्री राणी मुखर्जीने त्याची प्रेयसी आणि नंतर पत्नी टीनाची भूमिका दिसली होती, सिनेमात टिनाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू होतो असे दाखवण्यात आलेले. काजोलने नुकताच खुलासा केला की तिला 'कुछ कुछ होता है'मध्ये राणी मुखर्जीची भूमिका करायची होती.
काजोलने नेटफ्लिक्सच्या यूट्यूब चॅनेलवर राजीव मसंद यांच्यासोबत 'अॅक्टर्स राऊंडटेबल २०२३' मध्ये याचा खुलासा केला. काजोलच्या मते, तिला टीनाची भूमिका करायची होती, पण करण जोहरची इच्छा होती की तिने अंजलीची भूमिका करावी.
काजोल म्हणाली, "मी 'कुछ कुछ होता है' दरम्यान करण जोहरशी भांडले होते. मला राणीने साकारलेल्या टीनाची भूमिका करायची होती पण तो म्हणाला, 'नाही.' तू अंजलीचीच भूमिका करणार आहेस. मी म्हणाले, मला टीनाची भूमिका करायला आवडेल. पण मग करणने मी टीनासोबत काय करणार हे तुला माहीत नाही असे सांगून मला गप्प केले. मी त्याच्याशी ४५ मिनिटे भांडत राहिले, पण त्याने स्पष्ट नकार दिला.