Close

बिग बींशी तुलना करुन कंगनाने स्वत:चीच उडवून घेतली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल (Kangana Ranaut Compared Her With Amitabh Bachchan)

- कंगना रणौत सध्या सिनेसृष्टीपेक्षा राजकारणात जास्त सक्रिय झाली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून तिला लोकसभा निवडणूकीत उमेदवारी मिळाल्याने तिचा प्रचार सुरु आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ती भाषणे देत असते. अलीकडेच मंडीतील एका भाषणादरम्यान कंगनाने स्वत:ची तुलना बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी केली.

कंगनाने असे काही केले ज्यामुळे ती ट्विटरवर ट्रेंडवर आहे. मात्र यूजर्स तिच्यावर टीकाही करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यानंतर चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त प्रेम आणि आदर कोणाला मिळत असेल तर तो तिलाच... असे कंगना म्हणाली.

कंगना रणौतने तिच्या प्रतिष्ठेची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली, त्यानंतर सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय झाला. X वर कंगना रणौतच्या भाषणाची व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये कंगना म्हणतेय की, 'संपूर्ण देश हैराण आहे... की ती कंगना, राजस्थानला जोओ, पश्चिम बंगालला जाओ, दिल्लीला जाओ, की मणिपूरला जाओ....किती ते प्रेम आणि आदर... मी खात्रीने सांगू शकते की अमिताभ बच्चन यांच्यानंतर इंडस्ट्रीत कोणाला इतकं प्रेम आणि आदर मिळत असेल तर तो मला मिळते.

कंगना रणौतचा हा व्हिडिओ पाहून यूजर्स X वर खूप कमेंट करत आहेत आणि अभिनेत्रीवर टीका करत आहेत. काहीजण तिची खिल्लीही उडवत आहेत. एकाने लिहिले की हा तर खूप मोठा जोक आहे.

सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांमुळे कंगना रणौतने राजकारणात प्रवेश केल्याचे बोलले जात होते, परंतु अभिनेत्रीने काही आठवड्यांपूर्वी यावर स्पष्टीकरण देत राजकारणात येण्याचा निर्णय तिच्या चित्रपटांचे फ्लॉप होणे नसल्याचे ती म्हणाली. शाहरुख खानच्या कारकिर्दीचा आलेख आणि तिच्या चित्रपटांचा - 'क्वीन' आणि 'मणिकर्णिका'चा हवाला देत कंगना म्हणाली होती की जागतिक स्तरावर चित्रपटांच्या यशात चढ-उतार होणे सामान्य आहे. तिने स्वतःला आणि शाहरुख खानला ' स्टार्सची शेवटची पिढी' असे म्हटले.

Share this article