श्री रामजन्मभूमी अयोध्या येथील काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडले. या सोहळ्यासाठी खास निमंत्रण देखील पाठवली गेली आहेत. या यादीत तीन हजार व्हीव्हीआयपींसह एकूण सात हजार जणांचा समावेश आहे. 'रामायण' मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांचीही नावे या यादीत आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचे नाव नाही.
या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधीच आमंत्रित करण्यात आले आहे. आता ट्रस्टने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महानायक अमिताभ बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी, अक्षय कुमार, आशा भोसले यांच्यासह सुमारे सात हजार लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत. या राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल.
सेलिब्रिटींशिवाय १९९२ मध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत, योगगुरू राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपती गौतम अदानी ही मंडळीसुद्धा सहभागी होणार आहेत.