Close

या कारणामुळे अनंत राधिका अंबानीच्या लग्नात अनुपस्थित होती कंगना रणौत (Kangana Ranaut Revealed Why She Did Not Attend Anant Ambani Wedding)

अलीकडेच, मुलाखतीत, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने खुलासा केला की तिला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी आमंत्रण पत्रिका मिळाली होती, परंतु ती त्यांच्या लग्नाला आली नाही.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह १२ जुलै २०२४ रोजी झाला. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होते. अभिनेत्री कंगना राणौतलाही अंबानी कुटुंबाकडून लग्नाचं आमंत्रण आलं होतं.

कंगना राणौत अंबानी कुटुंबाच्या कोणत्याही लग्न समारंभात सहभागी झाली नव्हती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. आता कंगनाने याचे खरे कारण सांगितले आहे.

कंगना राणौतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनंत अंबानींच्या लग्नाला आमंत्रण मिळूनही ती का आली नाही याचा खुलासा केला.

अभिनेत्रीने सांगितले- मला अनंत अंबानींचा फोन आला होता. तो खूप गोड मुलगा आहे. त्याने मला त्याच्या लग्नाला यायला सांगितले. मी म्हणाले माझ्या घरी लग्न आहे. तो दिवस खूप शुभ दिवस होता. आणि माझ्या धाकट्या भावाचं लग्न होतं.

बरं, तरीही मी फिल्मी लग्नसोहळ्यांना जाणं टाळते. पण माझ्या शुभेच्छा या जोडप्यासोबत आहेत.

तीन दिवस चाललेल्या या विवाह सोहळ्याला जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अनंत अंबानींच्या लग्नाला सलमान खान, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा आणि हृतिक रोशन यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Share this article