सध्या संपूर्ण देश राममय झालाय असं म्हटल्यास हरकत नाही. अयोध्येतील त्या पवित्र भूमीवर बाबरी मशिद नसून रामजन्मभूमीच असल्याचे कोर्टाने घोषित केल्यापासून राम मंदिराचे काम जोरदार सुरु झालेले. आता हे काम अखेरच्या टप्प्यात आले असून येत्या २२ जानेवारीला या मंदिराचे उद्घाटनही होणार आहे.
गेले काही दिवस या मंदिराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच या सोहळ्याला कोणते सेलिब्रेटी जाणार याचीही चर्चा रंगली आहे. या सोहळ्यासाठी अभिनेते, राजकिय व्यक्ती आणि उद्योगपती अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे.
मात्र, आतापर्यंत अभिनेत्री कंगना रणौतला या सोहळ्याचे आमंत्रित मिळाले नसल्याचे बोलले जात होते, परंतु आता खुद्द कंगनानेच आपल्याला राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याचे सांगितले आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे.
कंगना रनौत को भी मिला राम मंदिर की प्राण-प्रतिष्ठा का न्यौता #KanganaRanaut #RamMandirPranPratishtha #RamMandirInauguration #RamMandirAyodhya pic.twitter.com/DRJYmHzYRr
— NBT Entertainment (@NBTEnt) January 5, 2024
कंगना रणौतने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की, अखेर तिला राम मंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण मिळाले आहे. त्याची झलक शेअर करताना कंगनाने 'राम सिया राम' हे गाणेही मागे लावले होते. निमंत्रण पत्राची झलक खूपच अप्रतिम दिसते.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला राम मंदिर ट्रस्टने ३००० व्हीआयपींसह ७००० लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत. त्यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, सनी देओल, टायगर श्रॉफ, आयुष्मान खुराना, अजय देवगण, कंगना रणौत या कलाकारांना अभिषेकासाठी निमंत्रण मिळाले आहे.
तर साऊथकडून या खास सोहळ्यासाठी सुपरस्टार रजनीकांत सह प्रभास, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, यश आणि ऋषभ शेट्टी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
याशिवाय सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंनाही आमंत्रित करण्यात आले आहे.