'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोमध्ये डॉ. मशूर गुलाठी आणि गुत्थीची भूमिका साकारणाऱ्या सुनील ग्रोवरने 2018 मध्ये 'द कपिल शर्मा शो'ला रामराम केला. शो सोडण्याचे कारण म्हणजे कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील मतभेद होते. पण आता पुन्हा एकदा ही जोडी नेटफ्लिक्सवर एकत्र दिसणार आहे.
कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील मतभेद सहा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर संपुष्टात आले आहेत आणि आता कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरची जोडी नेटफ्लिक्स शोमध्ये एकत्र दिसणार आहे. दोघांना नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
शेअर केलेल्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांनी सर्वप्रथम आपली ओळख करून दिली आहे आणि मग सुनील म्हणतो की नेटफ्लिक्सवर येत आहोत मग दोघे एकत्र बोलतात की आम्ही एकत्र येत आहोत. मग कपिल म्हणतो की आम्ही 190 देशांमध्ये एकत्र येत आहोत. सुनील गमतीच्या स्वरात म्हणतो की ऑस्ट्रेलिया राहू दे.
या लेटेस्ट व्हिडिओच्या शेवटी, अर्चना पूरण सिंह, कृष्णा अभिषेक, किकू शारदा आणि राजीव ठाकूर देखील दिसत आहेत. हा लेटेस्ट व्हिडिओ नेटफ्लिक्सने शेअर केला आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होते तो क्षण आला आहे. @kapilsharma आणि @whosunilgover BACK TOGETHER, लवकरच फक्त Netflix वर येत आहे.
2018 मध्ये सुनील ग्रोवरने कपिल शर्मा सोडला होता. शो सोडण्याचे कारण म्हणजे कपिल आणि सुनीलमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरून भांडण झाले होते. तेव्हापासून दोघांनी एकत्र काम करणे बंद केले होते. बरं आता दोघांमध्ये समेट झाला आहे. पुन्हा एकदा सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.