Close

राखेतून सावरत कपिल शर्माने स्वत:ला घडवलं, मिळेल ते काम करत केलेली मेहनत, आज आहे कोट्यवधींचा मालक ( kapil sharma birthday know his struggle story)

कपिल शर्मा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. वडील पंजाबमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल होते आणि आई गृहिणी. सर्व काही सुरळीत सुरु असताना १९९७ मध्ये त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांना कर्करोगाचे निदान झाले. वडिलांवर उपचार करण्यासाठी छोटी-मोठी नोकरी करण्याचा त्याने प्रयत्न केला. २००४ साली कॉमेडियनच्या डोक्यावरून वडिलांची सावली कायमची गेली.

Kapil Sharma cancels the shoot with Tiger and Disha

कपिल शर्माने उदरनिर्वाहासाठी कधी पीसीओ बूथमध्ये तर कधी कापड गिरणीत काम केले आहे. तो भजनेही गायचा. कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत कपिलने सांगितले होते की, तो लहान असताना टेलिफोन बूथमध्ये दरमहा ५०० रुपये कमवत होता.

वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी कापड गिरणीत काम केले, जिथे त्यांना दरमहा 900 रुपये मिळत. कपिल शर्माने असेही सांगितले की त्याचे वडील असताना त्याला कधीही दबाव जाणवला नाही. 10वी उत्तीर्ण झाल्यावर तो छोट्या-छोट्या नोकऱ्या करत असे, पण आपल्या गरजा भागवायचा. पण वडिलांच्या निधनानंतर त्याच्यावर इतक्या जबाबदाऱ्या आल्या की पैसे मिळवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले.

कपिल शर्माला गायक व्हायचे असले तरी कॉमेडियन बनणे त्याच्या नशिबात लिहिले होते. तो लाफ्टर चॅलेंजचा विजेता म्हणून उदयास आला. मात्र, या शोच्या ऑडिशनमध्ये त्याला एकदा नाकारण्यात आले होते हे तुम्हाला कदाचितच माहीत असेल.

होय, जेव्हा अमृतसरमध्ये लाफ्टर चॅलेंजचे ऑडिशन घेण्यात आले तेव्हा त्याला नकार देण्यात आला. मात्र, मित्राच्या सांगण्यावरून त्याने पुन्हा दिल्लीत ऑडिशन दिली आणि ट्रॉफी जिंकली. त्याने 10 लाखांचे बक्षीस जिंकले होते, ज्याच्या मदतीने त्याने आपल्या बहिणीचे लग्न केले.

लाफ्टर चॅलेंज जिंकल्यानंतर कपिल शर्माचे नशीब उघडले. तो कॉमेडी सर्कसमध्ये सामील झाला आणि नंतर त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस K9 उघडले. त्याने कलर्सशी हातमिळवणी केली आणि कॉमेडी नाइट्स विथ कपिलचा स्वतःचा शो सुरू केला. काही दिवसातच हा शो शीर्षस्थानी पोहोचला आणि कपिल जगातील सर्वोत्कृष्ट कॉमेडियन बनला.

करिअर चांगले चालले होते. यश मिळत होते, पण प्रत्येक गोष्ट नेहमीच चांगली असावी असे नाही. 2013 मध्ये कपिल शर्मा शोच्या सेटवर आग लागली होती आणि कॉमेडियनचे करोडोंचे नुकसान झाले होते. नंतर त्याने सोनीसोबत द कपिल शर्मा शो सुरू केला. नुकताच नेटफ्लिक्सवर कपिलचा द ग्रेट इंडियन कपिल शो सुरू झाला आहे. त्यांची संपत्ती 300 कोटींच्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आहे.

Share this article