Close

करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या नव्या सीझनची घोषणा; सामील होणार ‘या’ सेलिब्रिटी जोड्या (Karan Johar Announced The New Season Of Koffee With Karan)

करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. ‘कॉफी विथ करण सीझन 8’ मध्ये करण जोहर पुन्हा होस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये बॉलिवूडपासून साऊथपर्यंतचे सेलिब्रिटी सामील होणार आहेत. आता या शो मध्ये कोणकोणते सेलिब्रिटीज सामील होऊ शकतात यांची नावे समोर आली आहेत.

नुकतेच करणने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करण डबल रोलमध्ये दिसत आहे. यामधील एक करण मागील वर्षीच्या सीझनबाबत चर्चा करताना दिसत आहे अन्‌ दुसरा करण ह्या वर्षीच्या सीझनची घोषणा करत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने म्हटले आहे की, “असे झाले की, माझ्या स्वतःच्या विवेकाला मला ट्रोल करायचे आहे. पण त्याला काय वाटते त्याच्याकडे लक्ष देऊ नका, मी सीझन ८ ची तयारी करत आहे.”

कॉफी विथ करणचं हे नवं पर्व डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. इतर पर्वांप्रमाणेच यंदाही बॉलिवूडमधील सेलिब्रिटी जोड्या यात हजेरी लावणार आहेत.

यंदाच्या सीझनमध्ये बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय जोडपं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी, आलिया भट्ट तिची नणंद आणि अभिनेत्री करीना कपूर, तसेच बॉलिवूडमधील मित्रांची हिट जोडी रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण हे दोघेही सामील होणार असल्याचं बोललं जातंय.

बॉलिवूडचं हिट जोडपं रणवीर आणि दीपिकाही सामील होणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी शूटिंग देखील पूर्ण केल्याचं बोललं जातंय. एवढंच नाही तर करण जोहरशी छत्तीसचा आकडा असणारी अभिनेत्री कंगना रनौतच्या नावाची देखील चर्चा होत आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/