करण जोहर हा उत्कृष्ठ चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. पण बरेचदा त्याला त्याच्या वागण्याबोलण्यामुळे ट्रोल केले जाते. पण तो बहुतांशवेळी दुर्लक्ष करतो. पण यावेळी मात्र त्याला त्याच्या मिमिक्रीचे वाईट वाटले. याबाबत त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
“मी माझ्या आईबरोबर बसून टिव्ही बघत होतो आणि एका प्रतिष्ठित चॅनलवर मी एका नामांकित रिअॅलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला. त्यात एक कॉमेडी स्किट होतं ज्यात ते माझी नक्कल करत होते. त्यांनी अत्यंत वाईट नक्कल केली. ट्रोलर्स आणि निनावी लोकांकडून मी अशी अपेक्षा करू शकतो परंतु जेव्हा तुमचीच इंडस्ट्री अशा व्यक्तीचा अनादर करते जो व्यक्ती २५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे, तेव्हा काळानुसार सगळ्या गोष्टी आपोआप उघड होतात. यामुळे या गोष्टीचा मला राग नाही आला पण मला याचं खूप वाईट वाटलं.”
करण जोहरच्या या पोस्टवर त्याची खास मैत्रीण एकता कपूरने समर्थन देत हे फार वाईट असल्याचे म्हटले आहे.