'दादा साहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये करीना कपूर आणि तिचा एक्स शाहीद कपूर एकमेकांच्या समोरासमोर आले. पण अभिनेत्रीने शाहिद कपूरला ओळख न दाखवता निघून गेली आणि शाहिद पाहतच राहिला. करीना कपूरचे हे वागणे नेटिझन्सना अजिबात आवडले नाही आणि आता सोशल मीडियावर नेटिझन्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
2000 साली रिफ्युजी या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी करीना कपूर आज इंडस्ट्रीत एक मोठे नाव आहे. आपल्या स्टाईल आणि फॅशनने लोकांच्या मनावर राज्य करणारी करीना कपूर नुकतीच दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली.
काल म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला इंडस्ट्रीतील बहुतांश सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलीवूडच्या दिग्गज आणि ग्लॅमरस अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर यांनीही या पुरस्कारात सहभाग घेतला होता. सगळ्यांच्या नजरा करीना कपूरवर खिळल्या होत्या.
https://www.instagram.com/reel/C3lEYGhSr7m/?igsh=MWxhZXE4aWI2eWR0Ng==
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहिद कपूर चित्रपट निर्माते राज आणि डीकेसोबत आनंदाने पोज देत होता. त्यानंतर करीना कपूरने तिथे आली. शाहिद हसत हसत करिनाकडे बघत होता. करीना चित्रपट निर्माता राजशी प्रेमळपणे बोलली, परंतु तिच्या शेजारी उभ्या असलेल्या शाहिद कपूरकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केले आणि तेथून निघून गेली.
करिनाचे हे वागणे नेटिझन्सना अजिबात आवडले नाही. आणि ते सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.