सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी रामायण चित्रपटामुळे बऱ्यापैकी चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने तो प्रेक्षकांची मने जिंकत असतो. अभिनयासोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चर्चेत असतो. आलियासोबत लग्न होण्याआधी रणबीरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबतच जोडले गेले होते. यामध्ये सोनम कपूरचे नावदेखील रणबीरशी जोडले होते. रणबीरची बहिण करिश्मा कपूरला सोनम कपूर तिची वहिनी व्हावी, असे वाटत होते.
रणबीर कपूर आणि करिश्मा कपूर भावंडं आहेत. एकेकाळी करिश्माला सोनम कपूर रणबीरची बायको व्हावी असे वाटत होते. याचा खुलासा स्वतः सोनम कपूरने केला होता. सोनम कपूरने कॉफी विथ करण शोमध्ये याबाबत वक्तव्य केले होते.
सोनम कपूर आणि करिना कपूर जेव्हा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये एकत्र आल्या होत्या. त्यावेळी सोनमने याबाबत खुलासा केला. करण जोहरनं तिला प्रश्न विचारला की, तू कपूर कुटुंबाची सून व्हायचा विचार केला आहे का? त्यावर सोनमने उत्तर दिले होते की, 'मला वाटतं की, करिश्मा कपूरची इच्छा होती, परंतु आम्ही फक्त चांगले मित्र आहोत'.
रणबीर आणि सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनम कपूर आणि रणबीर कपूरने 'सांवरिया' या चित्रपटातून पदार्पण केले होते. याचदरम्यान त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. परंतु त्यानंतर काही दिवसातच रणबीरचं दीपिका पदुकोणसोबत नाव जोडलं गेलं होतं. त्यानंतर या दोघांचे नातं संपल्याच्या चर्चा होऊ लागल्या. अशातच कॉफी विथ करण मध्ये सोनम कपूरने याबाबत मोठा खुलासा केला होता.