नुकतेच डेव्हिड धवन यांच्या बीवी नंबर १ या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटामध्ये करिश्मा कपूर, सुष्मिता सेन, अनिल कपूर आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
दरम्यान करिश्मा कपूरला एकदा जेव्हा विचारण्यात आले होते की तिला तिची बहीण करीना कपूर खानला कोणत्या चित्रपटात कास्ट करावेसे वाटते. यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की, तिला बीवी नंबर 1 चा रिमेक करायचा आहे आणि त्यात करीनाने काम करावे अशी तिची इच्छा आहे.
करिश्मा आणि करीना या कपूर भगिनींमधील प्रेमाचे नाते आपणा सर्वांस माहितच आहे. करिश्माही तिच्या बहिणीसोबतच्या तिच्या अतूट बंधाबद्दल तपशीलवार सांगताना म्हणाली, “करीना आणि मी खूप जवळ आहोत आणि आम्ही आमच्या मुलांसह प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतो. आम्हा दोघींमध्ये अतिशय विश्वसनीय नातं असून आम्ही एकमेकांचे आधारस्तंभ (सपोर्ट सिस्टम) आहोत.
करिश्माच्या कामाबद्दल सांगायचं तर ती शेवटची होमी अदजानियाच्या मर्डर मुबारकमध्ये दिसली होती. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सारा अली खान, पंकज त्रिपाठी, विजय वर्मा आणि टिस्का चोप्रा यांच्याही भूमिका होत्या. करीना कपूरनेही राजेश ए कृष्णन दिग्दर्शित क्रू या चित्रपटातील तिच्या अभिनयाने मन जिंकले.