कार्तिक आर्यन आज 22 नोव्हेंबरला त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. कार्तिक आर्यनने त्याचा वाढदिवस त्याच्या कुटुंबासोबत अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला. कार्तिकने स्वत: त्याच्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याची आई त्याच्या वाढदिवसाला सत्यनारायणाची पुजा ठेवते. या खास दिवशी दाल मखनी, पनीर, रायता, पुलाव, पुरी असे त्याचे आवडते पदार्थ तयार केले जातात आणि एक खास खीर ही त्याच्या आईची खास रेसिपी आवर्जून असते.
कार्तिक त्याच्या आईचा खूप लाडका आहे. अलीकडे अभिनेत्याने सांगितले की आजही त्याची आई त्याला पॉकेटमनी देते. एवढेच नाही तर त्याने सांगितले की, त्याला त्याच्या वाढदिवसाला स्वतःला एक कार गिफ्ट करायची होती, पण त्याच्या आईने त्याला ती खरेदी करू दिली नाही.
कार्तिक आर्यनने सांगितले की, आजही त्याची आई त्याच्या पैशांची नोंद ठेवते आणि त्याला अनावश्यक खर्च करू देत नाही. त्याचे बँक बॅलन्स काय आहे किंवा बॅलन्स कसा तपासायचा हेही त्याला माहीत नाही. याबाबत खुलासा करताना कार्तिक म्हणाला, माझी आई माझे पैसे सांभाळते. माझ्या खात्यात किती पैसे आहेत किंवा पैसे आहेत की नाही हे मला माहीत नाही. आजही मला माझ्या खर्चासाठी आईकडून पॉकेटमनी मिळतो. मला काही विकत घ्यायचे असेल तर मला आधी माझ्या आईची परवानगी घ्यावी लागते."
कार्तिक म्हणाला, "मला माझ्या वाढदिवसाला एक कार घ्यायची होती, पण माझ्या आईने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगून नकार दिला. ती म्हणाली, कदाचित पुढच्या वर्षी किंवा काही काळानंतर घे, त्यामे मी आता ती खरेदी करू शकत नाही. तिची आज्ञा पाळावीच लागेल , कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. माझ्याकडे किती पैसे आहेत हे देखील मला माहित नाही, ते कोणते खाते आहे आणि शिल्लक कशी तपासायची हे मला माहित नाही."
कार्तिकला त्याच्या आईचा अभिमान आहे. तो पुढे म्हणाला, आईला वाटतं की मी अजून बिघडू शकतो. मी बिघडू नये अशी तिची इच्छा आहे. त्यामुळेच तिने मला नेहमी पॉकेटमनी देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून मी नेहमी जमिनीशी जोडला जाईल.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल बोलताना, त्याने रात्री उशिरा आपल्या कुटुंबासोबत केक कापून वाढदिवस साजरा केला, ज्याचा एक फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. फोटोत तो चॉकलेट केक मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे , केक कापण्यापूर्वी हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे. त्याचा पाळीव कुत्रा कटोरीदेखील त्याच्यासोबत आहे. फोटो शेअर करताना कार्तिकने इंस्टाग्रामवर लिहिले, 'सर्वांच्या प्रेमासाठी कृतज्ञ.'