बॉलिवूडच्या सध्याच्या आघाडीच्या आणि महागड्या अभिनेत्यांमध्ये कार्तिक आर्यनचे नाव अग्रस्थानी आहे. कार्तिकचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे निर्मात्यांना त्याला आपल्या सिनेमांमध्ये घ्यायचे असते. अशावेळी त्याने आपल्या फिमध्येही भरमसाठ वाढ केली आहे.
बक्कळ फि आकारत असल्यामुळे कार्तिक स्वतासाठी महागड्याच वस्तू वापरतो. त्याला महागड्या गाड्यांच्या खूप शौक आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्याने नवीकोरी अलिशान गाडी खरेदी केली आहे.
कार्तिकच्या नवीन एसयूव्ही कार 'रेंज रोव्हर'चे काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात कार्तिक त्याच्या नवीन कारसमोर नारळ फोडताना दिसत आहे. खुद्द कार्तिकने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या लाडक्या काटोरीसोबत त्याच्या नवीन कारच्या डिक्कीत आराम करताना दिसत आहे.
हा फोटो पोस्ट करताना कार्तिकने लिहिले आहे - आमची रेंज थोडी वाढली आहे. या पोस्टवर लोकांनी त्यांचे खूप अभिनंदन केले आहे. दिग्दर्शक कबीर खानने छान निवड चंदू अशी कमेंट केली. तर अनेकांनी त्याच्या पाळीव कुत्र्यावरही कमेंट करुन तो खूप क्युट असल्याचे म्हटले आहे.
कार्तिकच्या रेंज रोव्हर एसयूव्हीचा रंग बॉटल ग्रीन आहे. या लक्झरी कारची बाजारातील किंमत ४.९४ कोटी ते ६ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. आता कार्तिकच्या कारच्या कलेक्शनमध्ये ही चौथी कार समाविष्ट झाली आहे.
या नवीन रेंज रोव्हर व्यतिरिक्त कार्तिक आर्यनकडे लॅम्बोर्गिनी, मॅक्लारेन आणि पोर्श सारख्या महागड्या कार आहेत.