येत्या १ नोव्हेंबरला देशभरात 'करवा चौथ' हा सण साजरा केला जाणार आहे. प्रामुख्याने उत्तर भारतातील विवाहित महिलांद्वारे हा सण साजरा केला जातो. बॉलिवूड मधील काही अभिनेत्री यंदा पहिला करवा चौथ साजरा करणार आहेत. या यादीत कियारा अडवाणी-हंसिका मोटवानी ते परिणीती चोप्रा-अथिया शेट्टी यांचा समावेश आहे.
लग्नानंतरचा करवा चौथ हा नववधूसाठी खूपच खास असतो. आता बॉलिवूडमध्येही अशा कही अभिनेत्री आहेत ज्यांनी या वर्षी २०२३ मध्ये लग्न केले आहे. या अभिनेत्री आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या करवा चौथसाठी खूप उत्सुक आहेत.
कियारा अडवाणी
यात पहिलं नाव येत ते अभिनेत्री कियारा अडवाणीचे. कियाराने सिद्धार्थ मल्होत्रासोबत फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न केले आहे. कियारा तिचा पहिला करवा चौथ साजरा करण्यासाठी तयार आहे. 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली.
हे कपल बॉलिवूडचं अतिशय लाडकं कपल आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होतात. करवा चौथच्या दिवशी कियाराला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
परिणीती चोप्रा
आता दुसरे नाव येते नववधू परिणीती चोप्राचे. परिणीती चोप्राने सप्टेंबर २०२३ मध्ये राजस्थानमध्ये राजकारणी राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या लग्नाच्या अवघ्या एक महिन्यानंतरच परिणीती तिची पहिली करवा चौथ एकत्र साजरी करणार आहे.
स्वरा भास्कर
स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे फहाद अहमद यांनी ६ जानेवारी रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत कोर्ट मॅरेज केले होते, त्यानंतर या जोडप्याने लग्नाची पार्टी दिली. स्वरा भास्करची लग्नानंतरची ही पहिलीच करवा चौथ आहे. मात्र आता स्वरा आई झाली आहे. त्यामुळे स्वरा करवाचौथ साजरा करते की नाही याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
अथिया शेट्टी
सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टीचे नावही या यादीत सामील आहे. आथियाने जानेवारी २०२३ मध्ये क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले. इतरांप्रमाणे आथिया देखील यावर्षी तिचा पहिला करवा चौथ एकत्र साजरा करणार आहे.
हंसिका मोटवानी
साउथ अभिनेत्री हंसिका मोटवानी ही देखील लग्नानंतर पहिला करवा चौथ साजरा करणार आहे. हंसिकाने ४ डिसेंबर २०२२ रोजी जयपूरमधील मुंडोटा फोर्ट येथे सोहेल खातुरियाशी विवाह केला. त्यानंतर हे कपल बरेच चर्चेत आले होते. आता चाहते हंसिकाच्या पहिल्या करवा चौथचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
शिवालिका ओबेरॉय
शिवालिका ओबेरॉयने फेब्रुवारी २०२३ मध्ये चित्रपट निर्माता अभिषेक पाठकशी गोव्यात लग्न केले. त्यामुळे शिवालिका देखील या अभिनेत्रींमध्ये सहभागी झाली आहे जे यंदाचा करवा चौथ साजरी करणार आहेत.