रियालिटी शो खतरों के खिलाडी 14 फेम करण वीर मेहराची माजी पत्नी आणि अभिनेत्री निधी सेठच्या आयुष्यात प्रेम पुन्हा एकदा डोकावलं आहे. अभिनेत्रीने स्वतः तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना याची माहिती दिली.
लोकप्रिय टीव्ही अभिनेता आणि तिचा पती करण वीर मेहरा यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर निधी सेठने मुंबई सोडली आणि तिच्या पालकांसह बेंगळुरूला राहायला गेली. अभिनेत्रीला तिचा पती करण वीर मेहरापासून घटस्फोट होऊन 9 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे.
पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कामना फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर मिस्ट्री मॅनची झलक दाखवली आहे. एका हाताने मिस्ट्री मॅनचा हात पकडून, दुसऱ्या हातात सुंदर फुलांचा गुच्छ धरून एकमेकांच्या डोळ्यात पाहत असताना अभिनेत्री पोज देत आहे.
हे छायाचित्र शेअर करण्यासोबतच निधीने तिचे प्रेमसंबंधही जगासमोर अधिकृत केले आहेत.
निधीने शेअर केलेल्या फोटोसोबत कॅप्शनही लिहिले आहे. हरवलेले प्रेम पुन्हा एकत्र केल्याने तुटलेले हृदय बरे होते आणि आत्म्याचा पुनर्जन्म होतो. अधिकृतपणे माझा हा आनंद कायमचा आहे.
डोनल बिश्त, नेहा स्वामी आणि विकास कलंत्री यांच्यासह अनेक सेलिब्रिटी मित्रांनी त्यांचे नवीन आयुष्य सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
,