Close

पहिल्याच सिनेमाच्या स्क्रिनिंगला खुशी कपूरने अनोख्या पद्धतीने काढली आई श्रीदेवीची आठवण, १० वर्ष जुना आईचा गाऊन परिधान करुन पोहचली कार्यक्रमात (Khushi Kapoor remembers late Mom on Debut film premiere, Sridevi’s shimmery gown at ‘The Archies’ event)

बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'द आर्चीज'मधून तिने करिअरला सुरुवात केली. हा एक म्युझिक ड्रामा चित्रपट आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा यांनीही द आर्चीजमधून पदार्पण केले. हा चित्रपट उद्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वी, काल रात्री चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग (द आर्चीज स्क्रीनिंग) आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये या स्टार किड्सना सपोर्ट करण्यासाठी सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी आले होते.

यावेळी शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचला होता, तर संपूर्ण बच्चन कुटुंबही अगतस्या नंदाला प्रोत्साहन देण्यासाठी स्क्रीनिंगमध्ये दिसले. प्रत्येकजण एकमेकांपेक्षा सुंदर दिसत होते, सुहाना खानने लाल गाऊनमध्ये सर्व लाइमलाइट चोरली, तर बोनी कपूर आणि दिवंगत श्रीदेवीची लाडकी खुशी कपूर, सिल्व्हर कलरचा चमकणारा गाऊन परिधान करून रेड कार्पेटवर वावर दाखवला, हा एक अतिशय भावनिक क्षण होता आणि त्याचे कारण हे देखील खूप खास होते.

खुशी कपूरच्या पहिल्या चित्रपटाचे स्क्रिनिंग होते, त्यामुळे साहजिकच तिच्यासाठी हा एक खास प्रसंग होता. अशा खास प्रसंगी खुशी तिची आई श्रीदेवीला मिस करत असेल आणि तिची आठवण काढत असेल. त्यामुळे हा भावनिक आणि खास क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी खुशी कपूरने तिच्या आईचा 10 वर्ष जुना गाऊन परिधान केला होता. यासोबतच गाऊनला संपूर्ण लुक देण्यासाठी तिने श्रीदेवीचीच ज्वेलरीही घातली होती. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती.

श्रीदेवीने 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्ये आयफा अवॉर्ड्सदरम्यान हा गाऊन घातला होता. आता 10 वर्षांनंतर, आईचा तोच गाऊन, खुशीने घालून आपल्या आयुष्यातील हा सर्वात खास दिवस आईला समर्पित केला आणि तिची खास आठवण काढली. खुशी कपूरनेही याच गाऊनमधील काही फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. आता सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. चाहते तिच्या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजीसह प्रतिक्रिया देत आहेत. आईच्या गाऊनमध्ये खुशीला पाहून चाहत्यांनाही श्रीदेवीची आठवण येत आहे.

याआधी जान्हवी कपूरनेही हे केले आहे. 'मिली'च्या प्रमोशनवेळीही कपूरने आई श्रीदेवीची साडी नेसली होती. जान्हवी अनेकदा श्रीदेवीच्या साडीत दिसली आहे.

'द आर्चीज' चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. हा चित्रपट अमेरिकन कॉमिक्सवर आधारित आहे. खुशी कपूरसोबत या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि मेगा स्टार अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील दिसणार आहे. याशिवाय वेदांग रैना, मिहिर आहुजा, अदिती डॉट आणि युवराज मेंडा हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Share this article