डॉन ३ या सिनेमाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचा मुख्य अभिनेता म्हणून रणवीर सिंहला कास्ट करण्यात आल्याची घोषणा केलेली. आता या सिनेमाच्या मुख्य अभिनेत्रीची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी 'डॉन ३' मध्ये प्रियांका चोप्राऐवजी कियारा अडवाणीला कास्ट केले आहे. याबाबतची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र, कियारा अडवाणी या चित्रपटाचा भाग झाल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राप्रमाणे कोणालाच हा सिनेमा हिट करणं जमणार नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
कियारा अडवाणी डॉन ३ मध्ये ॲक्शनचा तडाका लावताना आहे. कियारा आणि रणवीरची केमिस्ट्री आणि ऑन-स्क्रीन जोडी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना आवडते की नाही याची सर्वांना उत्सुकता आहे.
. हा सिनेमा फ्लॉप होईल असे बऱ्याचजणांचे म्हणणे आहे. शाहरुख खानशिवाय 'डॉन ३' अपूर्ण असल्याचे लोक म्हणत आहेत. एका युजरने तर शाहरुखच्या डुप्लिकेट इब्राहिम कादरीला चित्रपटात कास्ट करा, चित्रपट हिट होईल, असाही सल्ला दिला आहे.