बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, कियारा अडवाणी तिच्या पुढील प्रोजेक्ट गेम चेंजरमध्ये साऊथचा सुपरस्टार राम चरणसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. इतकंच नाही तर ही अभिनेत्री डॉन ३ मध्येही दिसणार असल्याचं ऐकिवात आहे.
कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे नवीन फोटो शेअर करून इंटरनेटवर आग लावली आहे. कियाराने बोल्ड कटआउट गाऊनमधील सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
अभिनेत्री या कट आउट गाऊनमध्ये तिची परफेक्ट फिगर दाखवताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या सेक्सी आणि किलर लूकचे जबरदस्त फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत. कियाराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या कट आऊट गाऊनमध्ये कियाराचे सौंदर्य झळकत आहे. आउटफिटमध्ये अभिनेत्रीचे सेक्सी फिगर फ्लॉंट केले जात आहे. अभिनेत्रीने साधा मेकअप करुन टॉप बनसह तिचा लूक पूर्ण केला आहे.
कियाराची हे फोटो चाहत्यांना वेड लावत आहेत. कमेंट बॉक्समध्ये चाहते- कोणी इतके सुंदर कसे असू शकते, मिसेस मल्होत्रा नेहमीप्रमाणेच अप्रतिम दिसतात अशा कमेंट करत आहेत. अभिनेत्रीच्या बहुतेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर फायर आणि हार्ट इमोजी पाठवले आहेत.