किरण माने सोशल मीडियावर या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरसाठी खास पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी जान्हवीच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला. ज्यात जान्हवी गांधी आणि आंबेडकरांबद्दल आपलं मत व्यक्त करत होती.
त्यावर किरण मानेंनी लिहिले की, जान्हवी कपूरनं आश्चर्याचा धक्का दिलाय ! माझं मतच बदलून गेलं तिच्याविषयी... एका बाजूला बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये 'गांधी-आंबेडकर' यांच्याविषयी बोलताना खुप वेळा मी कुत्सित स्वर ऐकलाय.... अनुभवलाय... त्यांचे विचार आणि त्यांच्यावरची पुस्तकं न वाचताच. आय टी सेलनं व्हॉटस् ॲपवर फॉर्वर्ड केलेल्या उकीरड्यातल्या कचर्याला आणि प्रोपोगंडा सिनेमांच्या गटारघाणीला 'इतिहास' मानणार्या बहुतांश मराठी अभिनेते-अभिनेत्रींच्या सणसणीत मुस्काडात आहे ही ! हे ज्ञान खुप पुस्तकं वाचण्यानं आणि मेंदूच्या चिकीत्सक वापरानंच येतं.
सलाम जान्हवी... खुप खुप प्रेम
जान्हवी कपूरने लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, मला वाटतं की आंबेडकर आणि गांधी यांच्यातील चर्चा खूप मनोरंजक असते. त्यांच्यातील चर्चाच नाही तर त्यांचे मतप्रवाह कसे बदलत गेले.. एका विषयावर त्यांचे विचार कसे होते.. त्यांनी एकमेकांना प्रभावित देखील केलंय.
भारतीय समाजाला या दोन्ही महान व्यक्तींनी खूप वेगळी दिशा दिली. दोघांना एकमेकांबद्दल काय वाटायचं, हे खूप रोमांचक आहे. गांधी आणि आंबेडकर यांचे मतप्रवाह नक्कीच वेगळे होते. आंबेडकरांचे विचार नेहमी सरळ आणि स्पष्ट असायचे. तर गांधींचे विचार विकसित होत गेले. मला वाटतं की, तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून याबद्दल अधिक जाणून घेणं आणि ते स्वतःच सहन करणं याच खूप फरक आहे,