Close

क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींच्या टोपण नावांचा अर्थ आहे खास! (Kranti Redkar Twins Daughter Name Chabil And Godo Meaning In Marathi)

मुलांना अनेकदा टोपण नावे ठरवून दिली जातात किंवा ती सहज पडतात. आपण नावं ठेवताना अर्थ वगैरे बघून मगच ठेवतो पण टोपण नावं ही लाडाची हाक असते त्याकारणाने बरेचदा त्यांच्या अर्थाचा विचार केला जात नाही. परंतु काही जण टोपण नावं देखील अर्थपूर्ण ठेवतात.

सिनेकलाकारांच्या खासगी जीवनाबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना केवढा रस असतो हे सांगण्याची काहीच गरज नाही. कलाकारांच्या मुलांची नावे काय आहेत, याबाबतही चाहत्यांना उत्सुकता असते. अभिनेत्री क्रांती रेडकरला दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती रेडकर अनेकदा आपल्या मुलींचे व्हिडीओ शेअर करते. पण अद्याप तिने या दोघींचे चेहरे कॅमेऱ्यात दाखवलेले नाही. गंमत म्हणजे तिच्या दोन्ही मुलींची टोपण नावे ही त्यांच्या खऱ्या नावापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. आज या लेखात आपण त्यांची टोपण नावे आणि त्यांचे अर्थ समजून घेणार आहोत.

कारण बरेचदा आपण देखील मुलांना टोपण नावाने हाक मारतो. पण त्या टोपण नावांमध्ये 'बाबू', 'मुन्ना', 'पिंट्या', 'गुड्डी', 'सोनू' पिंकी अशाच नावांचा उल्लेख असतो. पण टोपण नावे ठेवताना त्यांच्या नावांचा देखील अर्थ तितकाच महत्त्वाचा असतो. यासाठी क्रांती रेडकरच्या दोन्ही मुलींची टोपण नावे एक उत्तम उदाहरण ठरत आहेत.

अनेक पालक आपल्या मुलांना टोपण नावाने हाक मारतात. ही नावे ठेवण्या मागचा उद्देश असा असतो की, बाळाचं ठेवलेलं नाव कठीण असतं. अशावेळी बाळाला किंवा त्याच्या आजी-आजोबांना उच्चार करणे सोपे होत नाही. अशावेळी पालक टोपण नाव ठेवतात. एवढंच नव्हे तर टोपण नाव ठेवताना त्यामध्ये प्रेमाने हाक मारणे असे असते. प्रेमाने हाक मारल्यामुळे त्याला लडीवाळपणे बोलावले जाते. आणि मग हेच नाव कायम राहतं.

छबील - क्रांती रेडकरने आपल्या जुळ्या मुलींमध्ये एका मुलीला 'छबील' असं नाव दिलं आहे. या नावाचा अर्थ आहे "झाशीची राणी". झाशीची राणी यांना 'छबीली' या टोपण नावाने हाक मारत असतं. त्यावरुन क्रांतीने 'छबील' हे टोपण नाव ठेवलं आहे.

गोदो - क्रांती रेडकरच्या दुसऱ्या मुलीचं नाव आहे 'गोदो'. Waiting for Godot या कादंबरीवरुन 'गोदो' हे टोपण नाव ठेवण्यात आलं आहे.

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी जुळ्या लेकींना 'झिया' आणि 'झायदा' अशी नावे दिली आहे. या दोन्ही नावामागे एक गोष्ट आहे.

समीर वानखेडे यांनी अवधुत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा आपल्या मुलींना ही नावे ठेवण्यामागचा उद्देश सांगितला होता.. 'झायदा' नाव हे समीर यांच्या आईच्या नावावरून ठेवलंय. त्यांच्या आईचं नाव 'झायदा' होतं. तर, 'झिया'चं नाव समीर यांच्या आत्याच्या नावावरून ठेवलंय.

‘झिया' या नावाचा अर्थ आहे 'प्रकाश', 'उजेड'. तसेच या नावाचा अर्थ आहे वैभव असा देखील. तर 'झायदा' या नावाचा अर्थ आहे 'भाग्यवान' आणि 'समृद्ध'

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

Share this article