Close

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर डिजिटल प्रिमियर (Lagna Kallol Movie Will Released On Ultra Marathi Ott Platform)

लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षक हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवत आहेत.

‘लग्नकल्लोळ' या चित्रपटात श्रुती आणि अथर्व यांची कथा दाखवण्यात आली आहे. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असते आणि ते लग्न करुन संसार थाटणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण देखील आहे. पण तिच्या आयुष्यात सगळे काही चुकीचे सुरु आहे. तिचा संसार हा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहे. त्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे. खरंच अशी घटना घडेल की घटनेला एक वेगळे वळण मिळेल? याविषयी जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार आहे.

चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, ऐश्वर्या आहेर आणि सुप्रिया कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपट मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच प्रिया बेर्डे, अमिता कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे हे लोकप्रिय कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/