Close

‘बिग बॉस १६’ हिंदी नंतर आयुष्य बदलले – शिव ठाकरे (Life Changed After ‘Bigg Boss 16’ Hindi – Shiv Thackeray)

मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. देशभरातील चाहत्यांची मनं जिंकून घेणारा शिव ठाकरे याने नुकतीच भारती सिंह हिच्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये हजेरी लावली होती. यात त्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत. यामुळे आता अभिनेता चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी सीझन २’ विषयी देखील बोलला आहे. त्याच्या एका खुलाशामुळे सगळेच हैराण झाले आहेत. टीव्हीचा प्रसिद्ध वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ प्रेक्षकांसाठी खूपच खास आहे. मात्र, या शोबाबत अनेकदा विविध गोष्टी समोर आल्या आहेत. आता शिव ठाकरे याने देखील असंच काही सांगितलं आहे.

अभिनेता शिव ठाकरे हा ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीझनचा विजेता ठरला होता. मात्र, आता या शोचा विजेता असलेल्या शिव ठाकरे यानेच या शोबाबत एक मोठा खुलासा केला आहे, जो ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शिव ठाकरे याने नुकतीच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शिव ठाकरे या शोबद्दल बोलला आहे. यादरम्यान शिवने खुलासा केला की, तो ‘बिग बॉस मराठी’ सीझन २ हा शो जिंकला असला तरी जिंकलेल्या रकमेपैकी निम्म्याहून अधिक रक्कम कापली गेली आणि त्याला खूप कमी बक्षीस रक्कम मिळाली. शिवने म्हटले की, पहिला या शोच्या विजेत्यांना बक्षीस रक्कम म्हणून २५ लाख रुपये मिळणार होते. पण, नंतर फिनालेच्या वेळी शेवटच्या क्षणी एक ट्विस्ट आला आणि विजेत्याची रक्कम १७ लाख रुपये करण्यात आली. पण हे इथेच थांबलं नाही. यानंतर आणखी काही काटछाट करून बक्षीस रक्कम म्हणून फक्त ११.५ लाख रुपये हातात आले. इतकेच नाही, तर कुटुंबाच्या विमान तिकीट भाडे आणि काही कपड्यांचे बिल यांसारख्या इतर सुविधाही कमी करण्यात आल्या.

https://youtu.be/fLgFyyW-aG4?si=lKSoOLYuc3Bjj50A

‘बिग बॉस मराठी २’नंतर शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’मध्ये देखील झळकला होता. तो हा शो जिंकू शकला नसला तरी, फर्स्ट रनर अप म्हणून त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या पॉडकास्टमध्ये बोलताना शिवने सांगितले की, या शोनंतर त्याचे आयुष्य खूप बदलले आणि त्याने खऱ्या अर्थाने कमाई सुरू केली. इतकेच नाही, तर अशीही वेळ आली, जेव्हा त्याला एकामागून एक तीन रिॲलिटी शो करायला मिळाले.

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Share this article