Close

मनोरंजन व पर्यटनाची सांगड घालणारा नवा चित्रपट ओटीटी मंचावर  (‘Lost  And Found In Singapore’  Is An Interactive Film On OTT Platform )

एक अंतर्मुख सोलो ट्रॅव्हलर (ऋत्विक धनजानी) आणि मैत्रीचा पुरस्कार करणारी साहसप्रेमी तरुणी (अपूर्वा अरोरा) यांची भेट सिंगापूरच्या पर्यटन स्थळावर होते. सिंगापूरची छान छान स्थळे पाहत त्यांचा प्रवास गुंतागुंतीचा होतो. जू चियाट आणि कातोंग मार्गे वेस्पा साईड कार टूर, नोन्यास, मंडाई वन्यजीव अभयारण्यातील आईस्क्रीम संग्रहालय, बर्ड पॅराडाईज या स्थळांवर त्यांची वाटचाल होते. असे कथानक असलेला ‘लॉस्ट ॲन्ड फाऊंड इन सिंगापूर’ हा नवा चित्रपट आज २५ ऑगस्ट रोजी एमएक्स प्लेअरवर विनामूल्य प्रदर्शित होत आहे.

मनोरंजन आणि पर्यटनाची सांगड घालणारा हा चित्रपट सिंगापूर टुरिझम बोर्ड आणि एमएक्स प्लेअरची कंटेंट शाखा व एमएक्स स्टुडिओजच्या सहकार्याने बनला आहे. अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम राबविलेला हा चित्रपट एंगेजमेंटसाठी ट्रिगर एकत्र करणे, इंटरॲक्टिव घटकाद्वारे मनोरंजन करण्याचे काम करतो. तरुण भारतीय प्रवाशांमध्ये विकसित होत असलेल्या आवडीनिवडींची पूर्तता करतो. चित्रपटाचे लेखक कनिष्क सिंह देव असून दिग्दर्शन हर्ष देडिया यांनी केले आहे.

‘स्टोरीटेलिंगला नवा आयाम देणारा हा अनोखा चित्रपट आहे’, असे एमएक्स प्लेअरने या बाबत म्हटले आहे.

Share this article