चित्रपट निर्माते मधु मंटेना सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. मसाबा गुप्ताला घटस्फोट दिल्यानंतर चार वर्षांनी, मधु मंटेनाने त्यांची दीर्घकाळची मैत्रीण योग प्रशिक्षक इरा त्रिवेदीशी लग्न केले, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होते. आता मधु मंटेना एका नव्या कारणाने चर्चेत आहेत. लग्नानंतर त्यांनी नाव बदलून पत्नीचे आडनाव धारण केले.
आपल्या समाजात लग्नानंतर पत्नी आपले आडनाव बदलून तिच्या नावासोबत पतीचे आडनाव जोडते, पण मधु मंटेना यांनी ही जुनी प्रथा बदलली आहे. लग्नानंतर त्यांनी नाव बदलून पत्नीचे 'त्रिवेदी' आडनाव लावले आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपले नाव बदलून मधु मंटेना त्रिवेदी असे ठेवले आहे, मात्र त्यांची पत्नी इरा त्रिवेदी हिने तिचे नाव बदललेले नाही.
मधु मंटेनाने मालदीवमधील त्यांच्या हनीमूनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, त्यात इरा एका पोस्टमध्ये स्विमवेअरमध्ये परिधान करुन दिसत आहे. हे फोटो शेअर करत मधुने लिहिले की, 'आता मला सांगायचे आहे, माझी पत्नी मालदीवसारखी सुंदर आहे.' आणखी एका पोस्टमध्ये मधुने लिहिले की, 'मी फक्त माझ्या पत्नीसोबत शो ऑफ करतो.'
या फोटोंमध्ये इरा पॉवर योगा करत तिची परफेक्ट फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
मधु मंटेना आणि इरा त्रिवेदी नुकतेच लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. दोघांनीही कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पूर्ण विधीवत लग्न केले. लग्नानंतर, या जोडप्याने रिसेप्शनचे आयोजन केले होते, ज्यामध्ये आमिर खान, त्याचा मुलगा जुनैद, अनिल कपूर, राकेश रोशन, अनुपम खेर आणि सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित लावलेली, कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
मधु मंटेना यांचे हे दुसरे लग्न आहे. याआधी 2015 मध्ये त्यांनी नीना गुप्ता यांची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर या वर्षी जानेवारीमध्ये मसाबाने 'बॉम्बे वेल्वेट' फेम अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले, जो आदिती राव हैदरीचा माजी पती होता.