जय जवान पथकाने एका सांस्कृतिक उत्सवात सर्वाधिक उंचीचा मानवी मनोरा उभारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईत तब्बल ४४ फूट उंचीवर बांधलेली दहीहंडी फोडून या पथकाने स्वतःला सिद्ध केले आहे. हे डेअर डेव्हिल्स कशाप्रकारे तंत्र, एकमेकांवरील अतूट विश्वास आणि समन्वय वापरून हे साध्य करतात ते पाहा या सोमवार दिनांक २६ मार्च रोजी रात्री ८ वाजता हिस्ट्रीटीव्ही १८ वर प्रसारित होणाऱ्या ओएमजी! ये मेरा इंडियावर.
जन्माष्टमी सणाचा एक महत्वाचा घटक असलेल्या दहीहंडीत तरूण मुले रंगीबेरंगी कपडे घालून मानवी मनोरा बनवतात आणि त्यावर चढून ती फोडतात. हा एक कामगिरी आणि एकत्र एकमेकांशी समन्वय साधण्याच्या तंत्राचा भाग आहे. ही कामगिरी त्यानंतर कधीच कोणीच केली नाही. या टीमने या शोसाठी तयार केलेल्या ४० फुटांच्या हंडीदरम्यान पाहा ते कशा प्रकारे तयारी करतात आणि इतक्या उंचावरून पडू नये यासाठी काय करतात ते या सोमवारी रात्री ८वाजता ' ओएमजी! ये मेरा इंडिया' वर.
मुंबईतल्या या गोविंदांच्या समन्वयाने आश्चर्यचकित व्हा आणि पाहा देशाच्या कानाकोपऱ्यातल्या इतर गोष्टी. दिल्लीतला एक तरूण संशोधक सर्वांसाठी स्वच्छ हवा परवडणारी बनवतोय तेही पाहा.